बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय राहत त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. सध्या ‘कौन बनेगा करोडपती १४’मुळे ते चर्चेत आहेत. पण त्यांना पुन्हा एकदा करोना व्हायरसची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांची करोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल एक मोठे विधान केले आहे.

हेही वाचा : ठरलं… ‘या’ दिवशी येणार कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’

बिग बींनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले की, आता यापूढे ते रोजच्या रोज त्यांच्या तब्येतीची माहिती चाहत्यांशी शेअर करणार नाहीत. कारण ते अजूनही कोरोनाशी लढत आहेत आणि रोजच्या रोज तब्येतीची माहिती शेअर करणे निरर्थक आहे असे त्यांना वाटते. तरी त्यांच्या तब्येतीबाबत महत्वाच्या बातम्या ते चाहत्यांपर्यंत नक्की पोहोचवतील असे त्यांनी सांगितले आहे. ते सर्व प्रकारची खबरदारी घेत आहेत आणि कोरोना प्रतिबंधात्मक सर्व लसींसह बूस्टर डोस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले.

आणखी वाचा : “काही गोष्टी करायच्यात पण…” अमिताभ बच्चन यांची बॉयकॉट ट्रेंडवर पहिली प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती १४’चे सूत्रसंचालन करताना दिसत होते. परंतु आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने या शोचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात येणार असे, अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये दिली. हे सांगत असताना ‘कौन बनेगा करोडपती १४’च्या चित्रीकरणाला ब्रेक लागल्याने दुःखही व्यक्त केले आहे. ‘कौन बनेगा करोडपती १४’च्या काही भागांचे चित्रीकरण आधीच पूर्ण झाल्याने ते भाग येत्या काही दिवसात प्रसारित केले जातील आणि उर्वरित भागांचे चित्रीकरण अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाल्यावर केले जाईल.

Story img Loader