टेलिव्हिजनवर येणाऱ्या सासू सुनांच्या मालिकेइतकीच पसंती ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाला मिळते. हा कार्यक्रम इतरही प्रादेशिक भाषेत सादर होतो तरी अमिताभ बच्चन यांची सर कोणत्याच कार्यक्रमात येत नाही. बच्चन यांनी या कार्यक्रमाचा दर्जा फार उंचावर नेऊन ठेवला आहे. या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या स्पर्धकांशी बच्चन अदबीने आणि आत्मियतेने गप्पा मारतात. त्यांची हीच गोष्ट लोकांना फार आवडते आणि म्हणूनच या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केबीसीच्या नवीन एपिसोडमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकाची तुलना बच्चन यांनी थेट देवाशी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. राजस्थानमधील एका शिक्षिकेबरोबर बच्चन केबीसी खेळत असताना हा प्रसंग घडला आणि बच्चन यांनी त्यांची तुलना थेट देवाशी केली. १६ वर्षं संसार सांभाळून शिक्षिका बनलेल्या शोभा कुवर यांनी त्यांच्या आयुष्याच्या काही घडामोडी या एपिसोडदरम्यान शेअर केल्या.

आणखी वाचा : हृतिक रोशनने दिले ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दिसण्याचे संकेत, म्हणाला “आधी हा चित्रपट मग…”

शोभा यांना मुलबाळ नाही, त्यामुळे त्यांनी इतर मुलांना खुश ठेवता यावं यासाठी शिक्षकाचा पेशा पत्करला. आपल्या या प्रवासाविषयी बोलताना शोभा यांनी केबीसीचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “मी अशी विद्यार्थी आहे जिला सगळं केबीसीमधून शिकता आलं आणि आता मी स्वतः एक शिक्षिका आहे. मला मुल नाही पण केबीसीमुळे आता माझ्याकडे शाळेतील ४५० मुलं आहेत.” शोभा यांची ही जीवनगाथा ऐकून बच्चन भावून झाले आणि म्हणाले, “जगात दोनच व्यक्ति देवासमान असतात, एक आई आणि दूसरी शिक्षक आणि तुम्ही या दोन्ही भूमिका बजावता, त्यासाठी तुमचे अभिनंदन.”

या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांना कोविड झाल्यानंतर काही काळ केबीसीच्या शूटिंगमध्ये ब्रेक घेतला होता आता लवकरच याचं शूटिंग सुरू होणार आहे. याबरोबच अमिताभ बच्चन सुरज बडजात्या यांच्या आगामी ‘उंचाई’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.