नुकताच ६ जून रोजी संपूर्ण भारतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. फक्त रायगडावर नाही तर महाराजांवर प्रेम करणाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने हा सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न केला. छत्रपतींवर प्रेम करणाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे महाराजांना मानाचा मुजरा दिला. यासगळ्यात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Photos : फक्त एका इन्स्टाग्राम पोस्टमधून समांथा कमावते ‘इतके’ कोटी

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत एक धाकटी मुलगी दिसत आहे. ही मुलगी अडीच वर्षांची आहे. या मुलीचे नाव रुत्वी गजानन जैनोजी आहे. रुत्वी ही बेळगावमधल्या मच्छे येथे राहणारी आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ही चिमुकली हातात छत्रपतींची मूर्ती घेऊन गडावर जात असल्याचे दिसते. त्यानंतर ती मूर्तीचा अभिषेक करते आणि नंतर कुंकू लावते. मागे श्रीपती, भूपती, गजपती हा आमचा राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी हे गाणं वाजतंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणी ही भारावून जाईल.

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ची कहाणी खोटी म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहंना, विवेक अग्निहोत्रीने दिले उत्तर

आणखी वाचा : विचित्र कपड्यांवरून ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदची एकूण संपत्ती आणि कमाई ऐकलीत का?

हा व्हिडीओ शेअर करत अमोल कोल्हे म्हणाले, “या गोड चिमुकलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आवर्जून आपल्याशी शेअर करतोय! छत्रपती शिवाजी महाराज की जय.”

आणखी वाचा : अक्षयला होती सासू डिंपल कपाडियासोबत डेटवर जाण्याची इच्छा, कारण…

डॉ. अमोल कोल्हे यांचं छत्रपतींवरचं प्रेम तर सगळ्यांना ठाऊक आहे. अमोल कोल्हेंनी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतही ते शिवरायांच्या भूमिकेत दिसले होते. वीर शिवाजी या हिंदी मालिकेतही त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. तसंच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून त्यांनी संभाजी महाराजांचं कार्य घराघरात पोहोचवलं. मालिकांबरोबरच त्यांनी ‘साहेब’, ‘रंगकर्मी’, ‘राजमाता जिजाऊ’, ‘अरे आवाज कुणाचा’ या चित्रपटात काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol kolhe shared a video of chhatrapati shivaji maharaj rajyabhishek by little girl from belgaum dcp