छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. यावरुन अनेक टीकाही होताना दिसत आहे. शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांवर आतापर्यंत अनेक कलाकृती येऊन गेल्या आहेत. अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेली स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य रंगले. या नाटकानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चार महिन्याच्या बाळाचे नामकरण केले. याचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकाचे प्रयोग २३ डिसेंबर ते २८ डिसेंबर या काळात औरंगाबादमध्ये पार पडले. त्यांच्या या नाटकाची प्रचंड क्रेझ आहे. लाखो प्रेक्षक या नाटकाला उपस्थिती दर्शवतात. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी एक पालक त्यांच्या ४ महिन्याच्या बाळाला घेऊन आले होते. या बाळाला पाहून डॉ. अमोल कोल्हे हे भारावले.
आणखी वाचा : खासदारांना माज असतो म्हणणाऱ्याला डॉ. अमोल कोल्हेंनी दिलं भन्नाट उत्तर; म्हणाले, “तुमचं मत…”
याबद्दल अमोल कोल्हेंनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते त्या लहान बाळाला हातात घेऊन त्याच्या आई वडिलांचे कौतुक करताना दिसत आहेत. हे बाळ ४ महिन्याचे आहे. ते माझ्याकडे या बाळाला नाव ठेवायचं म्हणून घेऊन आलेत. पण त्याच्या आई-वडिलांनी त्याचे नाव ठेवले असेल तेच त्याच्यासाठी योग्य असते. त्यांनी याचे नाव रियांश असे ठरवलं आहे आणि आपण तेच ठेवूया, असे अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
आणखी वाचा : “खासदार अमोल कोल्हे यांचा…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
“लहान वयातच इतिहासाचे बाळकडू मिळावे म्हणून ४ महिन्याच्या बाळाला ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य पाहण्यासाठी घेऊन येणाऱ्या आईवडिलांचा सार्थ अभिमान आणि खूप खूप कौतुक…! तसेच यावेळी बाळाचे नामकरण ‘रियांश’ असे करण्यात आले… भावी पिढीपर्यंत आपला इतिहास पोहोचावा म्हणूनच हा आटापिटा! हे समाधान कशातही मोजता येणार नाही! ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे पुढील प्रयोग २१ ते २६ जानेवारी नाशिक येथे होणार आहेत…” असे कॅप्शन देत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : Bigg Boss 16 मधील शिव ठाकरे एका आठवड्याला किती मानधन घेतो माहीत आहे का?
दरम्यान अमोल कोल्हे हे ‘राजा शिवछत्रपती’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकांमधून घराघरात पोहोचले. ऑक्टोबर महिन्यात त्यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.