राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. या चित्रपटाच्या मध्यंतरानंतर झोप लागते असा टोला त्यांनी पत्रकारांसमोर बोलताना लगावला आहे. आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी विधानसभेच्या इमारतीबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना मिटकरींनी ही टीका केलीय.
नक्की वाचा >> The Kashmir Files वरुन शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, “भाजपाच्या पाठबळामुळेच…”
“मी आयुष्यात जितके चित्रपट पाहिले आहेत त्यात कश्मीर फाइल्स पण पाहिला. इंटरव्हलनंतर माणूस झोपी जात असेल तर तो कश्मीर फाइल्समध्ये. संजय राऊत यांनी पण सांगितलं की त्या कश्मीर फाइल्समध्ये तेवढं फारसं काही सत्य नाही. त्या कश्मीर फाइलमध्ये असं एक वाक्य आहे की बालासाहेब ठाकरेने हमे बचाया. काश्मिरी पंडितांनी असं सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घरं दिली. आता त्यावरुन भाजपावाले टॅक्स फ्री करण्याचं आवाहन केलं,” असं मिटकरी म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> ‘२०२४ चा इलेक्शन स्टंट’, ‘मुस्लिमांनाही मारलं’, ‘BJP नेही आमच्यासाठी…’; The Kashmir Files बद्दल काश्मिरी पंडितांची मतं
तसेच पुढे बोलताना मिटकरींनी मोफत दाखवला जात असला तरी या चित्रपटाकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचा दावा केला. ” कश्मीर फाइल्स हा चित्रपट काही तरुणांच्या मनात उतरण्यासारखा नव्हता. नंतर आमच्या भागातल्या आमदाराने थेअटरमध्ये फ्री केला. तरी लोकं पहायला जात नाहीत,” असंही मिटकरी म्हणाले.
नक्की पाहा >> Photos: ‘द कश्मीर फाइल्स’चे समर्थक-विरोधक रितेशवर संतापले; कोणी ‘नेत्याचा मुलगा’ म्हटलं तर कोणी ‘झुंड’वरुन सुनावलं
“परवा एक भाजपाचे आमदार माझ्यासोबत एका वृत्तवाहिनीवर चर्चासत्रामध्ये होते. त्यांनी सांगितलं तुम्ही झुंड टॅक्स फ्री करु शकता कश्मीर फाइल्स का नाही? म्हणजे भाजपाच्या मनामध्ये झुंड चित्रपटाबद्दल जो आकस आहे, द्वेष आहे त्याचा मी थोडा पाठपुरावा केला. अमिताभ बच्चनसारखा मोठा सेलिब्रिटी डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरांच्या पाया लागतो हे काय भाजपाच्या लोकांना खटकलंय का याचा शोध घेतला पाहिजे,” असंही मिटकरींनी म्हटलं आहे. “झुंडचा इतका तिरस्कार का आणि कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का? मी तर म्हणतो आगामी काळात पिक्चर सुपर डुपर हिट करायचा असेल तर गुजरात फाइल्स नावाचा चित्रपट काढला गेला पाहिजे,” असा टोलाही मिटकरींनी लगावलाय.
नक्की वाचा >> “मी ‘गुजरात फाइल्स’ बनवायला तयार, सत्य मांडणार पण तुम्ही आश्वासन द्या की…”; दिग्दर्शकाची मोदींकडे मागणी
“कश्मीर फाइल्सच्या नावाखाली राजकारण भारतीय जनता पार्टी करतेय ते साफ चुकीचं आहे. कश्मीर फाइल्स हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे. तो का सुपर हिट होतोय तर मोहन भागवत बोलले, नरेंद्र मोदीजी बोलले म्हणून कश्मीर फाइल्स हिट होतोय. बाकी त्या चित्रपटातून प्रेरणा घ्यावी असं काही नाहीय,” असं मिटकरी म्हणाले आहेत.
“झुंडमधून आम्ही प्रेरणा घेऊ शकतो. झोपडपट्टीमधील मुलं राष्ट्रीय स्पर्धा कशी गाजवू शकतात हे नागराज मंजुळेंनी सांगितलंय त्यातून काही प्रेरणा तरुण घेऊ शकतात. कश्मीर फाइल्समध्ये फक्त आणि फक्त मुस्लीम द्वेष आहे आणि आपलं सोयीचं राजकारण एवढाच भाजपाचा उद्देश आहे,” अशी टीका मिटकरींनी केलीय.
नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”
११ मार्च रोजी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याने कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. मात्र याच चित्रपटामुळे देशामध्ये चित्रपटाच्या बाजूने आणि विरोधात असे दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे.