अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल पालेकर यांची ‘चित्रकार’ म्हणून असलेली ओळख फार कमी जणांना आहे. अभिनयाबरोबर त्यांनी आपला हा छंदही जोपासला आहे.
पालेकर यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या तैलचित्रांचे प्रदर्शन सध्या वरळी येथील ‘आर्ट अ‍ॅण्ड सोल’ कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. अमोल पालेकर यांच्या चित्रपटातील त्यांच्या ‘नायिका’ हे प्रदर्शन पाहण्यासाठी खास उपस्थित होत्या. बिंदिया गोस्वामी, झरिना वहाब, विद्या सिन्हा यांच्यासमवेत स्वत: अमोल पालेकर. बऱ्याच वर्षांनी एकत्र आलेल्या नायिका आणि नायकानी साहजिकच जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू आहे.

Story img Loader