‘स्टॅन्ली का डब्बा’ या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा अमोल गुप्ते आणि फॉक्स स्टार त्यांच्या आगामी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. चित्रपट समीक्षकांनी नावजलेल्या अमोल गुप्ते यांच्या ‘स्टॅन्ली का डब्बा’ या चित्रपटाने जगभरात पंधरा ठिकाणी प्रवास केल्या नंतर येत्या २९ तारखेला तो जपानमध्ये प्रदर्शित होत आहे. गुप्ते म्हणाले, या उन्हाळ्यात मी एका नवीन चित्रपटाची सुरुवात करीत असून, फॉक्स स्टारने माझ्यावर विश्वास ठेऊन सदर चित्रपटाच्या निर्मितीमध्ये माझ्यासोबत राहण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. एका चांगल्या संकल्पनेच्या चित्रपटाचे आम्ही भागीदार असल्याचा आम्हाला आनंद असल्याचे फॉक्स स्टारच्यावतीने सांगण्यात आले. फॉक्स स्टार स्टुडिओचे कार्यकारी प्रमुख विजय सिंग म्हणाले, अमोल आणि दीपाच्या आगामी चित्रपटाचे आम्ही भागीदार असल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. चित्रपट निर्मितीत अमोलची स्वत:ची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे आणि त्याचे ‘भावनाप्रधान नैतिकतापूर्ण चित्रपट’ हे तत्वज्ञान प्रेरणा देणारे असून नेहमीच्या वाटेने न जाणारे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा