बॉलिवूडमध्ये सध्या ‘#MeToo’ या मोहिमेंतर्गत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. बॉलिवूडमध्ये नावलौकिक कमावलेल्या अनेक दिग्गजांवर या मोहिमेअंतर्गंत गैरवर्तणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. नाना पाटेकर, आलोक नाथ,चेतन भगत, विकास बहल या सेलिब्रेटींनंतर आता दिग्दर्शक साजिद खान याच्यावर काही महिलांनी आरोप केले आहे. मात्र अभिनेत्री अमृता पुरीने केलेल्या आरोपामुळे अभिनेता फरहान अख्तर नाराज झाल्याचं समोर आलं आहे.
जोरदार चर्चा सुरु असलेल्या #MeToo या प्रकरणावर कोणतेही मोठे कलाकार सहजासहजी बोलायला तयार नाहीत. प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, फरहान अख्तर, स्वरा भास्कर, मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी या मोजक्या कलाकरांनीच त्यांची मत मांडली आहेत. #MeToo या मोहिमेतून ज्यावेळी महिला व्यक्त होऊ लागल्या तेव्हा फरहान अख्तरने लगेच त्याची प्रतिक्रिया नोंदवत अन्याय झालेल्या महिलांना पाठिंबा दिला होता. परंतु फरहानने अमृता पुरीला पाठिंबा न देता तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
साजिद खान कसा वागतो हे साऱ्या इंडस्ट्रीला माहित आहे. विशेष म्हणजे त्याच्या स्वभावाविषयी त्याच्या घरातल्यांनाही माहित होतं. परंतु आम्हाला साजिदविषयी काही माहितच नाही असा खोटा दावा त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत असल्याचं अमृताने ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं होतं. अमृताच्या याच मुद्द्यावर फरहान नाराज झाला असून त्याने अमृताला प्रत्युत्तर दिलं आहे.
I deeply resent your insinuation that me or my family knew of his behaviour yet did nothing. Your anger is justified. Your conspiracy theories not. @_Amrita_Puri https://t.co/MCLptZioWR
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) October 13, 2018
‘साजिद खान हा माझा चुलत भाऊ आहे. परंतु साजिद महिलांसोबत कसं वागला हे आम्हाला ठाऊक नाही. त्यामुळे त्याच्या स्वभावाविषयी आणि त्याच्या वर्तणुकीविषयी आम्हाला माहित होतं हे तुम्ही केलेले आरोप चुकीचे आहेत. तुमचा हा दावा योग्य नाही. साजिदवर ‘मी टू’ प्रकरणात ज्या पध्दतीचे आरोप झाले आहेत ते ऐकून खरंच आमच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे’, असं फरहान म्हणाला.
पुढे तो असंही म्हणाला, ‘अमृताने साजिदवर जो राग व्यक्त केला आहे तो मी समजू शकतो मात्र तिचा कुटुंबियांच्याबाबतीला दावा योग्य नाही’.
It was fairly well known that @SimplySajidK is a creep and is completely inappropriate as far as his conduct with women goes. I was warned to stay away from him if I ever came across him. I refuse to believe that it has come as a surprise to ppl from the industry or his family.
— Amrita Puri (@_Amrita_Puri) October 12, 2018
दरम्यान, साजिद खानवर महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा, रॅचेल व्हाइट यांनी लैंगिक गैरवर्तन आणि मानसिक छळाचे आरोप केले आहे. या आरोपानंतर साजिदवर अनेक स्तरातून टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे साजिदवरच्या आरोपानंतर अक्षय कुमारने तातडीनं ‘हाऊसफुल ४’चं चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे साजिदनं सारी नैतिक जबाबदारी स्वीकारत हाऊसफुलच्या दिग्दर्शक पदावरून पायउतार होत असल्याचं ट्विट केलं .