बिग बॉस फेम अमृता देशमुख कायम चर्चेत असते. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यावर तिने रेडिओ जॉकी म्हणून प्रवास सुरू केला. रेडिओवरील ‘टॉकरवडी’ या तिच्या शोला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. बिग बॉसमध्ये असताना अमृताचे अक्षय केळकर आणि प्रसाद जवादेसोबत नाव जोडले गेले. परंतु, सध्या मी कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नसून आयुष्याचा जोडीदार म्हणून कसा मुलगा हवा, याबाबत अमृताने खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : शाकाहारी असल्याचे सांगत खाल्ला ‘चिकन बर्गर’, रश्मिकाची नवी जाहिरात पाहून नेटकऱ्यांचा संताप

अमृता देशमुखने नुकतीच प्लॅनेट मराठीच्या ‘त्यानंतर सगळं बदललं’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या वेळी तिला तुझ्यासारखी सुंदर मुलगी चार वर्षं कशी काय सिंगल राहिली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अमृता म्हणाली, “मला कित्येक मुलं आवडली पण, म्हणतात ना…’जो हमें चाहिए उसे हम नहीं चाहिए और जिसे हम चाहिए वो किसको चाहिए’ तशी परिस्थिती झाली होती. काही मुलं रिलेशनशिपच्या बाबतीत थोडी साशंक वाटली. पण, माझे आधीपासून फार क्लीअर आहे की, एखादे नातं शेवटपर्यंत टिकवायचं, असा कोणीही मुलगा दिसला नाही, जो प्रेम करायला तयार होता आणि त्याची कमिटमेंटसाठीही तयारी होती. हे सर्व जुळून येणं फार अवघड असतं. यात माझी चार वर्षं गेली.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’चा ट्रेलर पाहताना क्रितीच्या ‘त्या’ कृतीने वेधले सर्वांचे लक्ष, व्हिडीओ व्हायरल

भविष्यात जोडीदार म्हणून तुला कसा मुलगा हवा आहे? तसंच मुलामध्ये कोणते गुण असतील, तर एखादं नातं तू पुढे नेतेस? यावर अमृता म्हणाली, “माझे विवाह संस्थांमध्ये नाव नोंदवलं होतं, तेव्हा आई मला अनेक मुलं शॉर्टलिस्ट करून द्यायची. त्यानंतर मी काही जणांना भेटायचे. ती मुलंसुद्धा मला विचारायची तुझ्या काय अपेक्षा आहेत? माझ्या खूप बेसिक अपेक्षा आहेत, त्या म्हणजे मुलाचा ‘सेन्स ऑफ ह्यूमर’ चांगला पाहिजे. भले त्यानं जास्त जोक्स क्रॅक नाही केले, तरी मी जे जोक्स करते ते त्याला कळले पाहिजेत आणि तो हसला पाहिजे आणि समजा मी एखाद्या स्टॅण्डअप कॉमेडीच्या शोमध्ये त्याच्याविषयी काही बोलले, तर ते मुलाला झेपायला हवं, उगाच माझा राग नको करायला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाच्या कुटुंबीयांनी आणि त्याने माझ्या सिनेक्षेत्रातील करिअरला पाठिंबा दिला पाहिजे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta deshmukh talks about relationship status and qualities of future husband in recent interview sva 00