Amruta Fadnavis At Anant – Radhika Shubh Aashirwad Ceremony : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा १२ जुलैला मुंबईत थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक पाहुण्यांनी खास उपस्थिती लावली होती. या शाही विवाहसोहळ्यानंतर सध्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत – राधिकाचा ‘शुभ आशीर्वाद’ समारंभ पार पडत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानंतर काही वेळातच या सोहळ्यात त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठमोळा लूक करत एन्ट्री घेतली.

अमृता फडणवीस यांचा पिवळ्या पैठणी साडीत मराठमोळा लूक

अमृता फडणवीस अनंत व राधिका अंबानींच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित होत्या. गुजरात येथील जामनगरमध्ये पार पडलेल्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुद्धा त्या पोहोचल्या होत्या. यानंतर मुंबईत पार पडलेल्या लग्नाआधीच्या विधींना देखील त्यांनी हजेरी लावली होती. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मिसेस उपमुख्यमंत्र्यांनी सुंदर लूक केला होता. यानुसार आशीर्वाद समारंभातील त्यांच्या मराठमोळ्या लूकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

devendra fadnavis ajit pawar eknath shinde (3)
Devendra Fadnavis Video: गृहखातं पुन्हा तुमच्याकडेच येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे बाबा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हेही वाचा : Video : अनंत – राधिकाचा लग्नानंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर, जोडीने पाया पडत घेतले पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद

अमृता फडणवीस यांनी अनंत – राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यात पिवळ्या रंगाची पैठणी साडी, केसात गजरा, गळ्यात मोठा नेकलेस असा मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं. तर, त्यांची लेक दिविजा फडणवीसने अबोली रंगाचा लेहेंगा घातला होता. या दोघीही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होत्या. त्यांचा हा व्हिडीओ voompla या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा : Anant Ambani Wedding : अनंत -राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी निघताना किम कार्दशियनच्या बहिणीचा घसरला पाय; Video Viral

amruta fadnavis
अमृता फडणवीस मराठमोळा लूक ( फोटो सौजन्य : voompla )

आता अनंत-राधिकाच्या लग्नाचं शाही रिसेप्शन रविवार ( १४ जुलै ) रोजी मुंबईत पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देखील देश-विदेशातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. शुभ आशीर्वाद कार्यक्रमाला या नवविवाहित जोडप्याने खास पारंपरिक लूक केला होता. थाटामाटात लग्न पार पडल्यावर सध्या अनंत व राधिकावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader