उर्फी जावेद कपड्यांवरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळत आहे. अशातच या प्रकरणावर आता अमृता फडणवीस यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली, त्या नेमकं काय म्हणाल्या …

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सामाजिक विषयांवरचे मत त्या परखडपणे मांडताना दिसतात. अमृता यांचं मूड बना लिया हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याच्या एक कार्यक्रमात त्यांना उर्फीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या “मला आज यावर बोलायचे नाही. आज मी माझ्या मूड बना लिया है च्या लॉन्च बद्दल बोलणार आहे. तसेच सगळ्यांना विनंती करते की तेके नाचना वर डान्स करा, उर्फीला पण सांगा डान्स करायला.”

“प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य जपणं म्हणजे…” प्राजक्ता माळीच्या उपक्रमाचं कौतुक करत राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

अमृता फडणवीसांच्या इतर गाण्यांप्रमाणे हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. टी सीरिजच्या युट्यूबवर हे गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. अवघ्या काही तासांतच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात अमृता यांचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. अमृता यांनी हे गाणं गाण्याबरोबरच डान्सही केला आहे.

दरम्यान उर्फी अतरंगी कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. चित्रविचित्र कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. परंतु, हा नंगानाच असाच सुरू राहणार असल्याचं उर्फी म्हणाली आहे.