राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. त्यांना कलाक्षेत्राचीही बरीच आवड आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचं प्रदर्शित झालेलं ‘मूड बना लिया’ गाणं तर सुपरहिट ठरलं. युट्यूबवर या गाण्याला ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. अमृता आपल्या कामाबरोबरच कुटुंबियांबरोबरचे फोटोही सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात. आता असाच एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.
आणखी वाचा – “त्याने मला मारण्याचा…” टीना दत्ताचे शालीन भानोतवर गंभीर आरोप, म्हणाली, “त्याचा खरा चेहरा …”
देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांना दिविजा नावाची गोड मुलगी आहे. दोघांचंही आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम आहे. आज दिविजाचा वाढदिवस आहे. याचनिमित्त अमृता यांनी एक कौटुंबिक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्नारे शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी लेकीला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“दिविजा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा” असं अमृता फडणवीस यांनी फोटो शेअर करत म्हटलं आहे. पुढे दिविजावरचं प्रेम व्यक्त करत त्या म्हणाल्या, “my heartbeat, my pumpkin, my munchkin, my sugarplum, sweetie pie, my bacchuda”. या पोस्टवरुनच अमृता यांचं त्यांच्या लेकीवर किती प्रेम आहे हे दिसून येतं.
आणखी वाचा – इतके वर्ष जगणार प्राजक्ता माळी, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “मला माहित आहे की…”
अमृता यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये देवेंद्र यांनी लेकीचा हात पकडलेला दिसत आहे. तसेच दिविजाला सोशल मीडियाद्वारे नेटकरी वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहेत. अमृता या पेशाने बँकर आहेत. त्यांनी गायलेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.