राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व त्यांची मुलगी दिविजा फडणवीस या अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी झाल्यात होत्या. १ ते ३ मार्चपर्यंत जामनगरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर पाहुणे माघारी परतत आहेत. अमृता व दिविजा या जामनगरहून परत येताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या.

अमृता फडणवीस व दिविजा यांचा व्हिडीओ ‘वूम्प्ला’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांचा हा व्हिडीओ जामनगर विमानतळावरील आहे. दोघीही जामनगरहून मुंबईला परत येताना पापाराझींनी हा व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओत दिसतंय की अमृता यांनी लाँग प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे, तर दिविजाने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. व्हिडीओमध्ये या दोघी माय-लेक सुंदर दिसत आहेत.

आनंद महिंद्रा यांच्या पत्नीला पाहिलंत का? अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जोडप्याने वेधलं लक्ष, अनुराधा करतात ‘हे’ काम

अमृता व दिविजाच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करून दोघीही सुंदर दिसत असल्याचं म्हणत आहेत. दरम्यान, अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात अमृता यांनी तिन्ही दिवस हजेरी लावली होती. या सोहळ्या उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंबीय तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील गेले होते.

“१३ वर्षांनी घरी…!” प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमन बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, पाकिस्तानी गाण्यावरील एंट्रीने वेधलं लक्ष

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडच्या आजोबांची अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला हजेरी, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे व्हिडीओ आले समोर

अनंत व राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा उत्साहात पार पडला. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. दोघांचंही लग्न जुलै महिन्यात मुंबईमध्ये होणार आहे, असं म्हटलं जात आहे. जामनगरमधील भव्य प्री-वेडिंग सोहळ्यानंतर लवकरच त्यांच्या लग्नाची लगबग मुंबईत पाहायला मिळेल.

Story img Loader