गेली अनेक दशके आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले यांना काही दिवसांपूर्वी राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतंच त्यांची भेट घेतली. त्यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता फडणवीस यांना समाजसेविका आणि गायिका म्हणूनही ओळखले जाते. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी आशा भोसले यांच्याबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोत आशा भोसले आणि अमृता फडणवीस छान हसताना दिसत आहेत. तर एका फोटोत त्या दोघीही एकमेकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “माझ्या आयुष्यातील सर्वच…” अमृता फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीची पोस्ट, Unseen फोटो केला शेअर

“मी नुकतंच आशा भोसले यांना भेटले. राज्याचा सर्वोच्च पुरस्कार असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर संगीतबाबत छान संवादही साधला. यावेळी त्यांनी मला सराव आणि व्हॉईस मॉड्युलेशनबद्दल मार्गदर्शन केले. आता आम्ही पुढील संगीत सत्रासाठी खूप उत्सुक आहोत”, असे कॅप्शन अमृता फडणवीस यांनी दिले आहे.

आणखी वाचा : “…तरच लग्न करेन”, अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना लग्नापूर्वी घातलेली अट

दरम्यान आशा भोसले यांना शुक्रवारी (२४ मार्च रोजी) सायंकाळी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०२१ या सालासाठी आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. २५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारचे स्वरूप आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘महाराष्ट्र भूषण २०२१’ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis meet singer asha bhosle share instagram post said had conversation on music nrp