राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची आवड आहे. आजवर त्यांनी अनेक गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पुन्हा एकदा त्या नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

अमृता फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नवीन गाण्याचं पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं. आता त्यांच्या गाण्याचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. अमृता फडणवीसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमृता गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत. त्यांच्या नव्या व बदललेल्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> “…शेवटी मीच जिंकावं”, ‘बिग बॉस मराठी’ची फर्स्ट फायनलिस्ट अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत

हेही वाचा>> “अन्याय व द्वेष…”, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा सहभाग

अमृता फडणवीसांच्या या नव्या गाण्याचे बोल ‘आज मैं मूड बना लिया’ असे आहेत. बॅचलर्सवर हे गाणं आधारित असणार आहे. ‘टी सीरिज’चं हे गाणं येत्या ६ जानेवारीला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

हेही वाचा>> ‘मूड बना लिया’ गाण्यावर लेकीची प्रतिक्रिया काय होती? अमृता फडणवीस म्हणाल्या…

अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर असून त्या गायिकाही आहेत. त्यांनी गायलेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.

Story img Loader