Amruta Fadnavis New Song : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्या चर्चेत असतात. तसंच अमृता फडणवीस यांचे ग्लॅमरस लूकमधील फोटो तुफान व्हायरल होतं असतात. अनेकदा गाण्यांमुळे अमृता फडणवीस ट्रोल देखील होतात. पण ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत अमृता फडणवीस आपल्या गाण्याचं कौशल्य कायम जपताना दिसतात. नुकतंच अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.
अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांच्या युट्यूब चॅनेलवर त्यांचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘सावन’ असं गाण्याचं नावं असून त्यांनी स्वतः गायलं आहे. “इस बार तेरे शहर में , जो सावन आया है, उसे मेरी आँखों ने…बरसना सिखाया हैं”, अशा अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याच्या ओळी आहेत. या नव्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अमृता यांनी ‘सावन’ गाणं प्रदर्शित झाल्याचं जाहीर केलं आहे.
हेही वाचा – मिलिंद गवळींनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतलं ठाण्यात नवं घर, आई-वडिलांबरोबर केला गृहप्रवेश
‘दिल को करार आया’, ‘गुली माता’, ‘यिम्मी यिम्मी’, ‘झालिमा’ अशा सुपरहिट गाण्यांचा गीतकार राणा सोटलने ‘सावन’ गाणं लिहिलं आहे. तर रजत नागपाल, केशव त्योहार यांनी संगीतबद्ध केलं आहे. पण अमृता फडणवीसांच्या ( Amruta Fadnavis ) या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाहीये.
अवघ्या तीन तासांत अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद होता?
अमृता फडणवीसांनी ( Amruta Fadnavis ) गायलेल्या ‘सावन’ या गाण्याला युट्यूबवर अवघ्या तीन तासांत फक्त ११३ व्ह्यूज होते. तर १९ जणांना लाइक केलं होतं. तसंच मोजून फक्त ६ जणांनी प्रतिक्रिया दिली होती. आता येत्या काळात अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? हे पाहणं गरजेचं आहे.
याआधी रामनवमी निमित्ताने अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांचं ‘हे राम’ प्रदर्शित झालं होतं. या गाण्यासाठी अमृता यांना साथ प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी दिली होती. पण या गाण्यावरूही अमृता यांना ट्रोल करण्यात आलं होतं. “मामींना ऑस्कर देण्यात यावा”, “नका ना मामी”, “हे राम, वाचवं आमचे कान”, अशा अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.