अमृता फडणवीस त्यांच्या गाण्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. नुकतंच त्यांचं ‘मूड बना लिया” हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यावरुन त्यांना ट्रोलही केलं गेलं. यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता म्हणाल्या, “मला खूप आनंद होत आहे की, लोकांनी माझं गाणं स्वीकारलं आणि त्यांना ते आवडलं आहे. आता गाण्यावर लहान मुलं रिल्सदेखील तयार करत आहेत. तसेच मला माझा जो विश्वास आहे. प्रत्येक स्त्री तिला जे काही करायचं आहे. तिला कोणी कितीही निगेटिव्ह बोलत असलं तरी तिने स्वत:ला कामातून सिद्ध केल्यावर तिला लोकांची नक्कीच साथ मिळत असते”.

हेही वाचा>> “ट्रॉफीवर नाव कोरल्यावर गर्लफ्रेंडची काय प्रतिक्रिया होती?”, ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर म्हणाला…

हेही वाचा>> तरुणांनी धुडगूस घातल्यानंतर गौतमी पाटीलने कार्यक्रम थांबवला, व्हिडीओ आला समोर

अमृता यांचं नवीन गाणं पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. “देवेंद्र गाणं चांगल आहे, असं म्हणाले. पण त्यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने ते गाणं नक्कीच ट्रोल होईल, असं त्यांनी मला आधीच सांगितले होतं. ते गाणं थोडं ट्रोलही झालं आहे. त्यासाठी मी तयारदेखील होते”, असं त्या म्हणाल्या.

हेही पाहा>> Photos: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचं चाहत्यांना ‘याड लागलं’; नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’चाही रेकॉर्ड मोडला

अमृता यांनी ट्रोलर्सलाही सुनावलं आहे. त्या म्हणाल्या, “मला ट्रोल होण्याची सवय झाली आहे. मी देवाचं भजन म्हटलं तरी ट्रोल केलं जातं. मी ट्रोल करणार्‍यांचे धन्यवाद मानते. माझ्या आतील शक्ती जागरूक झाली आहे”. मला ट्रोल केल्याने काही फरक पडत नसून एक ऊर्जा मिळत असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली. तसेच दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने काही तरी नवीन करत असते. त्यामुळे यंदादेखील असंच काही तरी करणार असल्याच त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis on trolling for new song said devendra fadnavis already told me this svk 88 kak