Anant Ambani And Radhika Merchant Pre Wedding Photos : रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींचा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला जामनगरमध्ये शुक्रवारपासून ( १ मार्च २०२४ ) सुरुवात झाली आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस होता. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जगभरातील दिग्गज मान्यवर भारतात आले होते. यामध्ये सुप्रसिद्ध हॉलीवूड गायिका रिहानाची सर्वाधिक चर्चा झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्री-वेडिंग सोहळ्याचा पहिला दिवस पार पडल्यावर रिहानाबरोबर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी फोटो शेअर केले आहेत. एवढंच नव्हे तर तिच्या परफॉर्मन्सवर अंबानी कुटुंबीय देखील थिरकल्याचं काही व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. मुकेश व नीता अंबानी यांनी लाडक्या लेकाच्या प्री-वेडिंगसाठी कलाविश्वापासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत सर्वांना आमंत्रित केलं होतं.

हेही वाचा : रिहानाने प्री-वेडिंग सोहळ्यात बोलताना चुकवलं अंबानींच्या सूनबाईंचं नाव; राधिकाऐवजी म्हटलं…, तुम्हीच पाहा Video

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी देखील खास उपस्थिती लावली होती. या सोहळ्यातील पहिला फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमृता आणि हॉलीवूड गायिका रिहाना यांची ग्रेट भेट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : भर कार्यक्रमात रिहानाचा ड्रेस उसवला, नीता अंबानींबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल

रिहानाबरोबरचा फोटो शेअर करत अमृता यांनी या फोटोला “अतिथी देवो भव” आणि “म्युझिकल इन्स्पिरेशन” असं कॅप्शन दिलं आहे. सध्या अमृता फडणवीस आणि रिहाना या दोघींचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.

दरम्यान, प्री-वेडिंग कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबाकडून जामनगरमध्ये मोठी तयारी करण्यात आली होती. या सगळ्या पाहुण्यांसाठी खास आलिशान तंबू उभारण्यात आले आहेत. या तंबूमध्ये सोफा, बेड, फ्रीज, टीव्हीपासून, एसीपर्यंतच्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम ३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.