राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून त्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आहेत. अमृता फडणवीसांचे ‘मूड बना लिया’ हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला तुफान हिट मिळत आहेत. अमृता फडणवीसांनी स्वतः हे गाणं गायलं असून त्या या गाण्यामध्ये डान्स करतानाही दिसत आहे. या गाण्याला एका दिवसातच दहा मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या गाण्यावर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. नुकतंच अमृता फडणवीस यांनी या गाण्यावर लेकीची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता फडणवीस यांनी गायलेले ‘मूड बना लिया’ हे गाणं सध्या चांगलेच हिट ठरले आहे. त्यांच्या गाण्याचे कौतुकही होताना दिसत आहे. या गाण्यावरुन अनेक रिल्सही व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या गाण्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत त्यांचे कौतुक केले आहे. तर काहींनी यावरुन टीकाही केली आहे. नुकतंच ‘आर जे सिद्धार्थ कनन’ याने अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या मुलीच्या प्रतिक्रियाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा : “अभिनेत्रींच्या कपड्यांवर लक्ष देण्यापेक्षा…” स्वरा भास्कर पुन्हा संतापली

त्यावर त्या म्हणाल्या, “माझी मुलगी माझ्यावर प्रचंड प्रेम करते. तिला मी कुठेही चुकतेय, असं वाटत नाही. माझ्या गाण्याची सिग्नेचर स्टेपही तिला माहिती आहे. ती घरात कायम त्यावर नाचताना दिसते.” यावर सिद्धार्थ कननने ‘तुमच्या घरात आई-लेक कायम नाचतानाच दिसतात का?’ असे मजेशीर पद्धतीने विचारले. यावर अमृता फडणवीसांनी ‘हो हो’ असे उत्तर दिले.

आणखी वाचा : “मी गरोदर होते, तेव्हा अशोक…” निवेदिता सराफ यांनी सांगितले लग्नानंतर सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्यामागचे कारण

अमृता फडणवीस यांनी गायलेलं ‘मूड बना लिया’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या गाण्याला नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण त्यांचं कौतुक करत आहेत तर काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे. यापूर्वीही त्यांची काही गाणी प्रदर्शित झाली होती. ‘मूड बना लिया’प्रमाणेच ती गाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis share daughter divija fadnavis reaction on mood banaleya song nrp