उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यामधील वाद सध्या बराच चर्चेत आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीबाबत काही वक्तव्य केली आहेत. तर उर्फीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकाराबाबत उत्तर देत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – अंगभर कपडे परिधान केल्यामुळे उर्फी जावेदच्या त्वचेवर अ‍ॅलर्जी, अभिनेत्रीचं कारण ऐकून चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “गोळ्या देऊन…”

उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यामधील वादादरम्यान काही राजकीय मंडळींनी यावर आपलं मत व्यक्त केलं. सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे या राजकीय मंडळींनी उर्फी व चित्रा वाघ यांच्या वादाबाबत प्रतिक्रिया दिली. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘मूड बना लिया’ हे अमृता फडणवीस यांचं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याच्या लाँचिंगदरम्यान त्यांना उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्या वादावर तुमचं मत काय? अस विचारण्यात आलं. मात्र यावर त्यांनी बोलणं टाळलं.

आणखी वाचा – जावेद अख्तर यांना भेटल्यावर उर्फीने त्यांच्याकडे मागितली ‘ही’ गोष्ट, संभाषण शेअर करत म्हणाली…

अमृता म्हणाल्या, “सध्यातरी मला ‘मूड बना लिया’ या गाण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. पण नंतर या विषयावर मी नक्की बोलेन. आता यावर मी बोलू शकत नाही. कारण मला विषय भरकटवायचा नाही. सगळ्यांनी तुम्ही या गाण्यावर नाचा, उर्फीलाही या गाण्यावर नाचवा.” ‘मूड बना लिया’ या अमृता फडणवीस यांच्या गाण्याला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis talk about chitra wagh urfi javed controversy see details kmd