सध्या सगळीकडे धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मंगळवारी धुळवड साजरी करण्यात आली, तर काही ठिकाणी आज बुधवारी धुळवड साजरी केली जात आहे. सेलिब्रिटींसह अनेक जण चाहत्यांना होळी व धुळवडीच्या शुभेच्छा देत आहेत. असाच शुभेच्छा देतानाचा एक व्हिडीओ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शेअर केला होता.

“तुम्ही फडणवीस साहेबांना शोभत नाही” अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणाले…

अमृता फडणवीस यांनी मुलगी दिवीजाबरोबरचा व्हिडीओ शेअर करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या या व्हिडीओत एक पोपटही दिसला होता. अमृता त्यांच्या मुलीसह “हॅप्पी होली” म्हणत होत्या. दोघींच्याही चेहऱ्यावर रंग होता आणि मुलीचा हात त्यांनी हातात घेतला होता. यावेळी अमृता यांच्या खांद्यावर पोपट बसलेला दिसत होता. पण, हा व्हिडीओतील पोपट नेटकऱ्यांना फारसा रुचलेला दिसत नाहीये. कारण त्यावरून अमृता फडणवीस यांना ट्रोल केलं जात आहे.

‘ह्यांना पेंग्विन चा त्रास आहे अन् ह्यांनी पोपट पाळला का?’, शेतकरी मरतोय तिकडं,’ अशा कमेंट् काहींनी केल्या आहेत.

amruta fadanvis troll
अमृता फडणवीसांच्या व्हिडीओवरील कमेंट (फोटो – स्क्रीनशॉट)

‘तुमच्या घरातील सर्व प्राण्यांना होळीच्या शुभेच्छा’, ‘मला वाटलं पोपट पण बोलेल’, ‘हॅप्पी होळी, तुम्हीही पृथ्वीवरील एक प्राणी आहात,’ अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर केल्या आहेत.

Story img Loader