बॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र भाग १ शिवा’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. या सगळ्यात लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. यामुळे अमृता ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का?, पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या फराह खानवर संतापले अशोक पंडित, म्हणाले…

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अमृतालाही चाहत्यांप्रमाणे रहावल नाही आणि तिने पोस्टवर कमेंट केली. “Ooooooohhhhhhhhhhh goooddddddd spectacular mind blowing out of this world” अशी कमेंट अमृताने त्या ट्रेलर पाहता केली.

आणखी वाचा : सोनम कपूरच्या बेबी शॉवरमधील गायक लियो कल्याणचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले…

आणखी वाचा : “आयुष्यात लाईफ पार्टनर नाही आणि आता या टप्प्यावर…”, करण जोहरने व्यक्त केली खंत

आणखी वाचा : ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप झाल्याचा अक्षय कुमारला बसला फटका, ‘धूम ४’ मधून अक्कीचा पत्ता कट?

अमृताची कमेंट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘इतकी ओव्हर अॅक्टिंग करू नकोस. इकता पण काही खास नाही हे तुला सुद्धा माहित आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू मार्व्हल चित्रपट पाहिले नाहीस का…किती ओव्हरअॅक्टिंग करते’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अमृताला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’

‘राझी’ या चित्रपटात अमृताने आलियासोबत काम केलंय. आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचंही अमृताने असंच कौतुक केलं होतं. अमृताही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar got troll for prasing brahmastra alia bhatt ranbir kapoor amitabh bachchan nagarjuna dcp