अमृता खानविलकर एकदा का मनमुराद-मनसोक्त-दिलखुलासपणे बोलायला लागली की काय छानसं बोलून जाईल कही सांगता येत नाही. स्टार प्रवाहच्या महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार या रिअलिटी खेळासाठी अमृता परिक्षक आहे. तिच्यासोबत नृत्यदिग्दर्शक सेव्हिओ बार्नेस आणि विश्वास नाटेकर हेदेखील आहेत. पण अमृताचा या नवीन संधीबाबत उत्साह ओसंडून वाहतो आहे. ती सांगत होती, या कार्यक्रमात पाच ते चौदा वर्षाची मुले सहभागी होणार असल्याने मला माझे लहानपण आठवेल अणि मलाही त्यांच्यासोबत लहान होता येईल. त्यात मी अशी मनमोकळी आणि प्रत्येक कामाचा छानसा अनुभव घेणारी, त्याचाही मला ऊपयोग होईलच. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राच्या अनुभवाचा फायदा मला पुढच्या सत्रात अधिकच होईल, अमृता खानविलकर खूप खूप बोलत असते, त्यातले महत्वाचे ते हे. आजपासून (२३ सप्टेंबर) सोमवार आणि मंगळवार रात्रौ साडेनऊ वाजता हा कार्यक्रम सादर होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा