मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. अभिनेत्रीबरोबरच अमृता एक उत्तम नृत्यांगनाही आहे. ‘वाजले की बारा’, ‘चंद्रा’ या गाण्यांमधून तिने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. मराठी चित्रपटांबरोबरच अमृताने हिंदी चित्रपटात आणि वेबमालिकांमध्येही काम केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लुटेरे’ या ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वरील वेब मालिकेत ती एकटीच स्त्री भूमिकेत आहे. ‘लुटेरे’ची व्यक्तिरेखा, अतिशय काळजीपूर्वक दक्षिण आफ्रिकेत केलेलं चित्रण या अनुभवांबरोबरच यंदा नवनव्या भूमिकांचं आव्हान स्वीकारण्यावर जोर दिला असून त्यात आनंद वाटत असल्याचे अमृताने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जय मेहता दिग्दर्शित आणि शैलेश सिंग निर्मित ‘लुटेरे’ या वेब मालिकेत अभिनेता रजत कपूर आणि विवेक गोम्बर यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत, तसेच काही आफ्रिकन कलाकारांनीदेखील या वेब मालिकेत काम केले आहे. त्याचबरोबर २०२४ मध्ये तिचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल आणि ‘लुटेरे’ या वेब मालिकेबद्दल अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ‘लोकसत्ता’शी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.
‘लुटेरे’ या वेब मालिकेत एकच स्त्रीपात्र आहे, त्यासाठीची आपली निवड आणि आपल्या पात्राविषयी सांगताना अमृता म्हणाली, ‘मी कािस्टग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांच्याकडे एका प्रकल्पाच्या ऑडिशनसाठी गेले होते आणि तिथे या ‘लुटेरे’ वेब मालिकेबद्दलची कुजबुज ऐकली. मग त्यानंतर या प्रकल्पाची पूर्ण माहिती समजून घेतल्यावर मला या मालिकेत काम करायचे आहे अशी इच्छाही व्यक्त केली आणि मग या मालिकेसाठी माझी निवड झाली. या वेब मालिकेत मी अविका गांधी ही भूमिका साकारली आहे. ‘लुटेरे’मधली अविका ही सोमालियामध्ये दक्षिण आफ्रिकेत तिचा नवरा विक्रम गांधी आणि मुलासोबत राहते आहे, पण तिला तिथे राहायची इच्छा नसते. म्हणून तिची तिथून बाहेर पडण्यासाठी खटपट सुरू असते. पण त्या दरम्यान तिचा मुलगा हरवतो आणि त्यानंतर ती आपल्या मुलाला शोधण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घेते आणि नक्की काय करते हे या वेब मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे’.
हेही वाचा >>>Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…
या वेब मालिकेच्या चित्रीकरणाचा अनुभव याआधीच्या अनुभवांपेक्षाही वेगळा होता असे तिने सांगितले. ‘आम्ही दक्षिण आफ्रिकेत कोविडनंतरच्या काळात चित्रीकरण करत होतो, त्या चित्रीकरणा दरम्यान मला आपण आपल्या देशात खूप सुरक्षित असतो हे फार मनापासून जाणवले. परदेशात गेल्यावरच आपल्याला आपल्या देशाची किंमत कळते, कारण दक्षिण आफ्रिकेत आम्ही जिथे चित्रीकरण केले ती जागा फार भयानक होती. तिथे दिवसाढवळय़ा अपहरण होण्याचे प्रकार सर्रास घडायचे. त्यामुळे मला फक्त माझी झोपण्याची खोली, जिममध्ये जाणे आणि चित्रीकरणाला जाणे एवढीच मुभा होती. पहिल्या दिवशी आम्ही चित्रीकरण स्थळी गाडीने पोहोचलो, तो भाग म्हणजे जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखला जातो. त्या झोपडपट्टीच्या परिसरात आम्ही चित्रीकरण करणार होतो. तिथे पोहोचल्यावर गाडीत गरम होऊ लागले म्हणून मी गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याचक्षणी आमचा कार्यकारी निर्माता धावत आला. ‘तुम्ही गाडीचा दरवाजा बंद करा, नाहीतर कोणी कधी येऊन तुमचे अपहरण करेल समजणारही नाही. त्या अशा दहशतीच्या भागात आम्ही खोटय़ा बंदुका वापरून चित्रीकरण करत होतो. माझ्या सुरक्षेसाठी तिथे माझ्याबरोबर सतत एक माणूस असायचा. त्या भागातील लोकांकडे खऱ्या बंदुका होत्या. तर एकूणच अशा वातावरणात आम्ही ते चित्रीकरण पूर्ण केलेले आहे’. ही गंमत सांगतानाच तिथे असताना आपल्याला एक चांगली सवय लागल्याचेही अमृताने सांगितले. मला सतत सगळय़ा घडामोडी लिहिण्याची सवय लागली. रोज माझ्या आयुष्यात काय घडते? माझा दिवस कसा जातो हे लिहून काढायला मी शिकले, असेही तिने सांगितले.
कलाकाराला भाषेचे बंधन नको..
हिंदी आणि मराठी भाषेत काम करताना फारसा फरक जाणवत नाही असे अमृता म्हणते. ‘मराठी भाषा ही एका राज्यापुरती मर्यादित आहे, पण हिंदी ही आपल्या देशात अनेक राज्यांमध्ये बोलली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते, हाच एक फरक मला दोन्हीकडच्या कलाकृतीत जाणवतो. बाकी दोन्ही भाषांत काम करताना कलाकारांना समान मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे माझ्यासाठी हिंदी आणि मराठी असे काही वेगळे नाही. आपल्याला कामाचा आनंद मिळतो तोपर्यंत आपण मनापासून काम करावे, मग त्यात भाषेचे बंधन नसले पाहिजे’ असे ठाम मत अमृताने व्यक्त केले.
चित्रीकरण, नृत्यप्रशिक्षण, अभ्यास..
या वर्षभरात मी ‘ललिता शिवाजी बाबर’, संजय जाधव दिग्दर्शित ‘कलावती’, ‘पठ्ठे बापूराव’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून स्वत:वर आणखी मेहनत घेण्याचे ठरवले आहे, असे तिने सांगितले. ‘कोविडनंतरची दोन वर्षे ही प्रत्येक कलाकारासाठी अवघड होती, त्यामुळे स्वत:वर मेहनत घेऊन स्वत:ची प्रगती करण्याचा आणि नवनवीन गोष्टी शिकण्याचा मी या वर्षी निर्णय घेतला आहे’ असे सांगणाऱ्या अमृताने यंदा कथक नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. ‘युनिव्हर्सिटीतून मी पहिली आले. त्यानंतर मी योग शिक्षक प्रशिक्षण घेते आहे, मला या वर्षी एम. ए.सुद्धा करायचे आहे. त्यामुळे या वर्षी चित्रपटांबरोबरच अशा खूप साऱ्या नवनवीन गोष्टी करण्याचा विचार आहे. जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं तेव्हाची मी आणि आता माझ्याकडे खूप काम आहे तर आत्ताची मी हा फरक मी अनुभवलेला आहे. त्यामुळे मला स्वत:ची प्रगती करणे किंवा नवनवीन गोष्टी आत्मसात करणे थांबवायचे नाही आहे’ असेही तिने विश्वासाने सांगितले.