विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. फक्त अमृताची भूमिका नाही तर तिच्या डान्सचंही कौतुक होतं आहे. या चित्रपटात अमृतावर चंद्रा हे गाणं चित्रीत करण्यात आलं. सध्या हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून अनेक लोक या गाण्यावर डान्स करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असाच एक व्हिडीओ अमृताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा एका आजीबाईंचा व्हिडीओ आहे. त्यांनी या गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “चंद्रा गाण्याला … त्याच्या #choreography ला प्रचंड प्रेम मिळत आहे आणि त्या साठी तुमची चंद्रा तुम्हाला फक्त आणि फक्त परतफेड म्हणून सलाम करू शकतेचंद्रा गाण्यावर इतकं भरभरून प्रेम करण्या साठी मनापासून धन्यवाद”, असे कॅप्शन अमृताने दिले आहे.
आणखी वाचा : अभिनेता आणि पटकथालेखक शिव कुमार सुब्रह्मण्यम यांचे निधनआणखी वाचा
आणखी वाचा : राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांचा मुलगा ‘या’ चित्रपटातून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
दरम्यान, चंद्रा हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. हे गाणं आता पर्यंत २३ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. या आजीबाईंचा व्हिडीओ शेअर करण्याआधी अमृताने असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. तर काही दिवसांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चंद्रा या भूमिकेसाठी तिने कशा प्रकारे तयारी केली आणि कसं नाकं टोचलं हे सांगितलं होतं. पण त्यानंतर प्रेक्षकांनी केलेलं कौतुक हे तिच्यासाठी पोचपावती आहे.