विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील सर्व लावण्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. तिची ही गाणी आणि त्यातील नृत्य हे प्रचंड चर्चेत आहेत. या सर्व गाण्यांचे दिग्दर्शन नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आणि दिपाली विचारे यांनी केले आहे. नुकतंच अमृता खानविलकरने नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

अमृता खानविलकर ही इन्स्टाग्रामवर कायमच चर्चेत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आशिष पाटीलच्या नृत्याचे विशेष कौतुक केले आहे. तसेच तिने चंद्रमुखी या चित्रपटातील लावण्यांचे नृत्य दिग्दर्शन केल्याच्या निमित्ताने त्याचे आभारही मानले आहेत. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

‘चंद्रमुखी’साठी आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकरची निवड का केली? प्रसाद ओकने सांगितले कारण

अमृता खानविलकरची पोस्ट

#चंद्रासांगतेएका

“आशु…,तुला मी पहिल्यांदा एका हिंदी show मधे नाचताना पाहिलं होतं तेव्हाच मनात ठरवलं होतं …. ह्याला गाठायचं आणि सांगायचं काय रे बाबा तुझी passion …तुझा grace मी फिदा झाले तुझ्या वर…

मग आपली भेट झाली आणि मी ते तुला सांगितलं हि आणि आज पर्यंत सांगतेय आणि ह्या पुढे हि सांगत राहणार, अनेक shows मधून आपण एकत्र काम केला …. मग lockdown मध्ये आपण #amritkala करायचं ठरवलं ….आणि मी मनातल्या मनात तुला गुरु मानू लागले … तुझ्या passion ने ….कले च्या साधनेने मला वेड लावलं …मी विचार करायचे मी कधी आशु सारखी नाचणार ….

आज प्रेक्षक चंद्रमुखी सिनेमा मधलं बाई ग बघतात आणि प्रचंड कौतुक करतात “ठेहराव”च…. हाव भावांचं…. आणि हे सगळं शक्य झालं तुझ्यामुळे आशु…. तू जशी दिशा दाखवलीस तशी चालत गेले. तुझे ह्या टप्यावर मी जरूर आभार मानीन, पण आपल्याला अजून खूप काही करायच आहे. so let’s rock ashu ….in your style”, असे अमृता खानविलकर म्हणाली. त्यासोबतच तिने आर्या आंबेकर, अजय अतुल आणि गुरु ठाकूर यांचेही विशेष आभार मानले.

“पॅक-अपनंतर आम्ही आधी त्यावरचं रक्त काढायचो अन्…”, अमृता खानविलकरने सांगितला ‘चंद्रमुखी’च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

दरम्यान ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ ही ठसकेबाज लावणी सर्वत्र चर्चेत आहे. त्यानंतर नुकतंच गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘बाई गं…’या बैठकीच्या लावणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या गाण्याला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. तर, आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजाने गाण्याची रंगत वाढवली आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने आर्याने प्रथमच अजय-अतुल सोबत काम केलं आहे. ‘लावणीकिंग’ म्हणून चर्चेत असणाऱ्या आशिष पाटील यांनी या लावणीचं नृत्य दिग्दर्शन केले आहे. या लावणीत अमृताच्या नृत्य आणि सौंदर्याने या गाण्याला चार चांद लागले आहेत.