प्रसिद्ध युट्यूबर विनायक माळी हा नेहमीच त्याच्या विविध व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. विनायक माळीचे युट्यूबवर सध्या २२ लाख १० हजार सब्सक्राइबर्स आहेत. नुकतंच विनायक माळीने अभिनेत्री अमृता खानविलकरसोबतचा एक हटके व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

या व्हिडीओत अमृता खानविलकर विनायक माळीवर प्रचंड चिडल्याचेही दिसत आहे. या व्हिडीओची सुरुवात अमृता खानविलकरच्या एंट्रीने होते. यात विनायक माळी हा अमृता खानविलकरला भेटतो आणि त्यानंतर तो चकित होऊन तिला आगामी चंद्रमुखी या चित्रपटाबद्दल विचारताना दिसत आहे. यावेळी अमृता म्हणते, ‘हो येत्या २९ एप्रिलला चंद्रमुखी चित्रपट प्रदर्शित होत आहे.’

anant ambani and Radhika merchant dance at best friend sangeet ceremony video viral
Video: “अनारकली डिस्को चली…”, मुकेश अंबानींच्या धाकट्या सूनेचा मैत्रिणींसह जबरदस्त डान्स, तर अनंत अंबानी थिरकला ‘या’ गाण्यावर
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
shocking video
Video : “जीव एवढा स्वस्त असतो का?” रिल बनवण्यासाठी तरुणीने केला उंच झाडाच्या शेंड्यावर चढून डान्स, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?

VIDEO : ‘चंद्रमुखी’चा हटके अंदाज, अमृता खानविलकरने चक्क पुणे मेट्रोत धरला ‘चंद्रा’वर ठेका

त्यावर तो तिला सांगतो, ‘तुम्ही आता आलाच आहात तर मला डान्स शिकवा’. त्यावर ती म्हणते ‘इकडे’. तर त्यावर विनायक माळी म्हणतो, ‘हो आमच्या गावात जत्रा आहे ना, तर लोकांना सांगता येईल की अमृता खानविलकरने डान्स शिकवला’. तर त्यावर ती त्याला चंद्रा या गाण्यातील एक स्टेप शिकवते. त्यावर तो काही तरी भलतीच स्टेप करतो. त्याची ही स्टेप बघून अमृता फार वैतागते.

यानंतर ती पुन्हा एकदा त्याला डान्स शिकवते. मात्र विनायक हा वेगळ्याच पद्धतीने डान्स करतो. त्यावर ती संतापते आणि म्हणते ‘मला जायचं आहे. मला तुला डान्स शिकवायचा नाही’. त्यावर तो ‘दोन मिनिट’ करतो. पण त्यावरही अमृता म्हणते, ‘खूप झालं. तू २९ एप्रिलला चंद्रमुखी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघ आणि तिकडेच काय ते शिक’. हे बोलून ती आत निघून येते.

त्यावर विनायक हा मागे येऊन ‘तिकीटाचे पैसे तुम्ही देता का?’ असा प्रश्न विचारतो. त्यावर ती अजूनच चिडते आणि विचारते ‘किती द्यायचे?’ तर तो बोटावर मोजत ३६० रुपये असं सांगतो. यानंतर अमृता त्याला पैसे आणून देते. यावर तो ‘पॉपर्कानसाठी…’ तर ते ऐकून अमृता तोंडावर दरवाजा बंद करते. अमृता खानविलकर आणि विनायक माळी यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ त्यांनी गंमत म्हणून केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी चंद्रमुखी चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला आहे.

“करवटें बदलते रहें सारी रात, कोणामुळे ते विचारु नका…”; प्राजक्ता माळीची हटके पोस्ट चर्चेत

दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.

Story img Loader