अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल यांनी २०१४ साली लग्न केलं होतं. त्यानंतर २०२०मध्ये अमृतानं मुलगा वीरला जन्म दिला. पण नुकत्याच एका लाइव्ह सेशनमध्ये अमृता आणि आरजे अनमोल यांनी सरोगसी, आयव्हीएफ आणि मग आई होण्यासाठी केलेला संघर्ष यावर भाष्य केलं आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाचा खुलासा केला. आपल्या या संघर्षाची कहाणी या दोघांनीही त्यांच्या युट्यूब चॅनेलवर सांगितली आणि ही कथा सांगताना दोघंही खूप भावुक झालेले दिसले.
अमृतानं या व्हिडीओमध्ये सांगितलं की, ‘जेव्हा मला समजलं की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये समस्या आहेत. तेव्हा आम्ही IUI, सरोगसी आयव्हीएफ, होमियोपॅथी, आयुर्वेद असे बरेच पर्याय वापरून पाहिले. पण यातून काहीच लाभ झाला नाही. मी २०१६ पासून प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत होते. जेव्हा IUI मध्ये अपयश आलं तेव्हा डॉक्टरांनी मला सरोगसीचा पर्याय सुचवला. पण यासोबत त्याचं नुकसानही मला माहीत होतं.’
अनुराग कश्यपशी अफेअरच्या चर्चा; अबॉर्शनबद्दल धक्कादायक खुलासा करणारी मंदाना संतापली
आरजे अनमोल या व्हिडीओमध्ये म्हणाला, “आम्ही सरोगेट आईला भेटलो. त्यानंतर सरोगसीची प्रक्रिया सुरू झाली. तरीही डॉक्टर्सनी अमृताला खरंच सरोगसीमधून बाळ हवंय का याची खात्री करून घेतली. त्यानंतर डॉक्टर आम्हाला सातत्यानं सरोगेट आईची प्रेग्नन्सी आणि बाळाच्या हार्टबीटबाबत माहिती देत होते. पण अचानक एक दिवस आम्हाला एक वाईट बातमी समजली. सरोगेट आईच्या पोटात वाढणारं बाळ आम्ही गमावलं. हे ऐकल्यावर आम्ही मनातून खूपच ढासळलो होतो.”
या घटनेनंतर अमृता आणि अनमोल यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घ्यायचं ठरवलं. मात्र याचाही रिजल्ट चांगला आला नाही. दोन वेळा आयव्हीएफसाठी प्रयत्न केल्यानंतरही प्रेग्नन्सीमध्ये समस्या येत असल्यानं पुन्हा यासाठी प्रयत्न करणं अमृता आणि अनमोल यांनी सोडून दिलं. आई- बाबा होण्यासाठी अमृता आणि अनमोल यांची शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यांनी आयुर्वेदिक डॉक्टरची मदत घेतली. पण त्यांच्या औषधांचा अमृताच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला. एवढंच नाही तर या दोघांनी अगदी मंदिरात जाऊन नवस, उपवास अशा गोष्टीही केल्या. मात्र कशाचा काहीच परिणाम झाला नाही.
जाहिरात वादानंतर मिलिंद सोमणने दिला अक्षय कुमारला पाठिंबा; म्हणाला “तुझी निवड योग्यच…”
अमृता सांगते, ‘एवढं सर्व झाल्यानंतर मी मनाने खूपच थकले होते. एक वेळ अशी आली की खरंच आपल्याला बाळ हवं आहे का? आपल्या या अशा धावपळीच्या आयुष्यात आपल्याला हे जमणार आहे का? असे विचारही येऊ लागले. आता आपण आई-बाबा होऊ शकणार नाही असं वाटत असतानाच आम्ही थायलंड ट्रीपवर गेलो आणि तिथून आल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. मला एक वेगळीच फिलिंग जाणवत होती त्यामुळे मी ब्लड टेस्ट केली आणि मला माझ्या प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली. नोव्हेंबर २०२० मध्ये आमचा मुलगा वीरचा जन्म झाला.’