मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री अमृता सुभाष ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. अमृता ही नेहमीच विविध भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसते. अमृताने नाटक, मालिका, चित्रपट, लेखन अशा सर्वच ठिकाणी उत्तम कामगिरी केली आहे. नुकतंच तिने तिच्या पतीसोबत एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

अमृता सुभाषने नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओत अमृता किचन टिश्यूचे रोल घेऊन येते. त्यानंतर तिने ते चुकून आणल्याचे पती संदेश कुलकर्णी यांना सांगते. यानंतर तिचे पती तो टिश्यूचा रोल मधून कापत त्याचे दोन भाग करतात आणि त्याचा वापर कर असे सांगतात. अमृताच्या या गंमतीजमतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उर्फी जावेदच्या फॅशन स्टाईलवर रणवीरचे हटके उत्तर, आलिया भट्ट आणि करण जोहरला हसू आवरेना

अमृताने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘टिश्यू नो इश्यू! #पुनश्चहनिमून, १० जुलै ५.३० वा भरत नाट्य मंदिर, पुणे. BMS वर बुकिंग चालू’, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे. यात तिने ‘पुनःश्च हनिमून’ असा उच्चार केला आहे.

Koffee with Karan 7 : “मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेक्स…” रणवीरने केला लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा खुलासा

अमृता सुभाष हिचे‘पुनःश्च हनिमून’ हे नाटक नव्या जोमाने पुन्हा सुरु झालं आहे. चांगल्या आणि दर्जेदार नाटकांना अजूनही रसिक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुनःश्च हनिमून या नाटकाचे आतापर्यंत अनेक प्रयोग झाले आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संदेश कुलकर्णी यांनी केले आहे.

Story img Loader