मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष फक्त मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. मराठी मालिका आणि चित्रपटांनंतर अमृताने बॉलिवूड चित्रपटांमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संपूर्ण देशभरात अमृताच्या अभिनयाचे चाहते आहेत. नुकतीच अमृताने अभिनेता सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ कार्यक्रमात हजेरी लावली. त्यानंतर नुकतीच अमृताने सोशल मीडियावर सुबोध भावेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अमृता सुभाष इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ आणि कामाचे अपडेट चाहत्यांशी शेअर करताना दिसते. चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. पण आता तिने तिचा जवळचा मित्र सुबोध भावेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमधून तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आणखी वाचा- आमिर खानने मराठमोळ्या अमृता सुभाषला लिहिलं होतं प्रेमपत्र, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
आपल्या पोस्टमध्ये अमृता सुभाषने लिहिलं, “सुबोध भावे माझा जवळचा मित्र. माझा प्रत्येक प्रोजेक्ट पाहिलेला, अगदी पुरुषोत्तम करंडक पासून ते ‘सास बहु आचार’ सर्व पाहिलेला, माझ्या आयुष्यातल्या कित्येक चढ-उतारात माझी साथ दिलेला. अप्रतिम कलाकार आणि लाखमोलाचा माणूस. त्यानं ‘बस बाई बस’ या कार्यक्रमासाठी माझ्याशी साधलेला हा संवाद म्हणूनच माझ्यासाठी अनमोल आहे. मला झी मराठीनं ‘अवघाची संसार’मुळे घरोघरी पोहोचवलं, या चॅनलची मी सदैव ऋणी राहीन. या चॅनेलवर होणारं हे कौतुक माझ्यासाठी माहेरपणाच्या कौतुकाची भावना देणारं आहे.”
आणखी वाचा- दिवाळीत देशभरात घुमणार शिवगर्जना, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
दरम्यान अमृता सुभाषच्या कामाबद्दल बोलायचं तर तिची मराठी मालिका ‘अवघाची संसार’ ही मालिक प्रचंड गाजली. त्यानंतर तिने बऱ्याच हिट मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच ‘गली बॉय’, ‘धमाका’, ‘चोक्ड’ (Choked) यांसारख्या चित्रपटामध्ये काम केलंय. तिची ‘गली बॉय’मधील भूमिका खूप गाजली होती. तर झी मराठीचा ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे. सेलिब्रेटींसह राजकीय क्षेत्रातील नामवंत महिलांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.