छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्या भटनागरचे ७ डिसेंबर रोजी करोनामुळे निधन झाले. सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आता अभिनेता शोएब इब्राहिमने सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

शोएबने दिव्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘मला तुझी नेहमी आठवण येईल’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. ‘जीत गई तो पिया मोरे’ या मालिकेत शोएब आणि दिव्याने एकत्र काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

दिव्याच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर तिला न्युमोनिया झाल्याचे समोर आले. गोरेगाव येथील एसआरवी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. दिव्याच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे तिला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी वयाच्या ३४व्या वर्षी दिव्याने अखेर श्वास घेतला.

Story img Loader