आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहते मंडळी नेहमीच उत्सुक असतात. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी किंवा विमानतळावर आपला आवडता कलाकार दिसला की चाहते मंडळी त्याला पाहण्यासाठी गर्दी करतात. हे आपण अनेक व्हायरल व्हिडीओद्वारे पाहिलं आहे. इतकंच नव्हे तर काही मंडळी तर अभिनेता किंवा अभिनेत्याला पाहिल्यावर रडताना देखील दिसतात. पण अभिनेता अक्षय कुमारच्याबाबतीत काही वेगळंच घडताना दिसलं.
आणखी वाचा – Koffee With Karan 7 : “मुलं झाल्यानंतर सेक्स लाइफ बदलतं का?” करीना-आमिरचं उत्तर ऐकून करण जोहरची बोलती बंद
दिग्दर्शक आनंद एल राय यांच्याबरोबर अक्षय मुंबई विमानतळावर दिसला. तो आपल्या गाडीच्या दिशेने जात असताना एका महिलेने त्याला पाहिलं. अक्षयला पाहताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने लगेचच अक्षयला येऊन किस केलं. अक्षयला देखील याची कल्पना नव्हती. एका महिलेने अचानक येऊन किस केलेलं पाहता तोही आश्चर्यचकित झाला.
पाहा व्हिडीओ
ही महिला वृद्ध असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अक्षय देखील त्या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून भारावून गेला. आपल्या चाहतीला दिलेली उत्तम वागणूक पाहून नेटकऱ्यांनी देखील अक्षयचं कौतुक केलं आहे. पापाराझी छायाचित्रकारांनी हा संपूर्ण प्रसंग त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपला. यावेळी अक्षयने काळ्या रंगाचं टी-शर्ट, पँट आणि त्याच रंगाची टोपी परिधान केली असल्याचं दिसत आहे.
आणखी वाचा – कारमध्ये शरीरसंबंध ते थ्रीसम, विजय देवरकोंडाचे सेक्स लाइफबद्दल खुलासे
सध्या अक्षय त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. येत्या ११ ऑगस्टला त्याचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. शिवाय ‘राम सेतू’ चित्रपटामध्येही तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय जॅकलिन फर्नांडिसबरोबर काम करताना दिसेल.