सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे यांच्यासह २० पेक्षा अधिक आमदार गुवाहाटीला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी ट्वीट करून काल भाष्य केलं. नारायण राणे यांनी आपल्या ट्वीटमधून एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचं समर्थन केलं. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल बोललं जात आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय? यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सध्या राजकीय विषयात सर्वात महत्त्वाचं नाव एकनाथ शिंदे असल्यानं ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य होते. त्यामुळे त्यांच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : आनंद दिघे जयंती: टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘लांडगे’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार?

गेल्या महिन्यात आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात आनंद दिघेंचा मृत्यू अपघाती असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण चित्रपटाच्या शेवटी मात्र एका सीनमुळं सध्या चर्चेला उधाण आलं आहे.

आणखी वाचा : साहेब घात झाला…., म्हणत राजन विचारेंचे आनंद दिघे यांना पत्र

चित्रपटात शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांची जवळची माणसं, कार्यकर्ते यांचा अश्रृंचा बांध फुटल्याचं दाखवण्यात आलं. हे सुरू असतानाच एक व्यक्ती रडणाऱ्या एका कार्यकर्त्याला दिघे कशामुळे गेले? असं विचारताना दाखण्यात आलंय. यावर तो कार्यकर्ता हार्ट अटॅक ने गेले असं सांगतो. यावर तो व्यक्ती कुणी सांगितलं असंही विचारतो? डॉक्टरांनी सांगितल्याचं कार्यकर्ता सांगतो. मग तो व्यक्ती त्या कार्यकर्त्याला तुम्ही रिपोर्ट पाहिले का? सात वाजेपर्यंत साहेब बरे होते…असं म्हणताना त्या कार्यकर्त्यांकडं प्रश्नार्थक नजरेने पाहतना दिसतो.

आणखी वाचा : “जोपर्यंत तुम्ही दिघेसाहेब म्हणून समोर आहात, तोपर्यंत…”; प्रसाद ओकने सांगितला सेटवरील ‘तो’ किस्सा

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

हा सीन संपतो तिथं प्रविण तरडेंचा आवाज पुन्हा ऐकाला येतो. ते म्हणतात, ‘काय चाल्लात? आनंद दिघेंची गोष्ट इथंच संपली नाही, पुन्हा भेटू लवकरच’. या शेवटच्या सीनमुळं ‘धर्मवीर’ चित्रपटाचा पुढचा भाग येणार का, येणार असेल तो केव्हा येणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand dighe death reason in dharmveer marathi movie dcp