दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रचंड गाजला. या चित्रपटाने आतापर्यंत बरेच पुरस्कारही पटकावले आहेत. चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या रील्स शेअर केल्या होत्या. आता प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. रामचरणसह या गाण्याच्या सिग्नेचर स्टेप करतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. अनेकदा ते ट्विटरवर असे व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करतात जे व्हायरल होताना दिसतात. आताही त्यांनी अभिनेता राम चरण याच्याबरोबर एक असा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची खूप चर्चा होताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी हैदराबादमध्ये महिंद्रा ग्रुपच्या जेन३ फॉर्म्युला ई रेसच्या लॉन्चवेळी अभिनेता राम चरणची भेट घेतली.

aishwarya and avinash narkar dances on tamil song
Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा तामिळ गाण्यावर रोमँटिक अंदाज! नेटकरी म्हणाले, “एव्हरग्रीन जोडी…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Anjali Damania Demand
Anjali Damania : व्हायरल फुटेजनंतर अंजली दमानियांची मागणी, “राजेश पाटील यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि…”
Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab shramesh betkar reels video viral
Video: “चेहरा क्या देखते हो…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब-श्रमेश बेटकरचा ‘हा’ Reel व्हिडीओ पाहिलात का? एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “आपल्याला एन्ट्री आवडलीय…”, डॅडी पुष्पाकाकीच्या मदतीने सूर्याविरुद्ध पुन्हा कट करणार; पाहा, मालिकेतील ट्विस्ट….
Premachi Goshta fame komal Balaji and Sanjivani Jadhav dance on asha Bhosale song
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील इंद्राचा लेकीबरोबर आशा भोसलेंच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “रानी माझ्या मळ्यामंदी…”, तुळजा-सूर्याचा मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर भन्नाट डान्स; पाहा BTS सीन
yelkot yelkot jaiyelkot yelkot jai malhar song vaghya murali dance malhar
“मल्हारी मार्तंड शिव मल्हार!” वाघ्या-मुरळीच्या रुपात सादर केले जबरदस्त नृत्य; Viral Video पाहून प्रत्येक मराठी व्यक्तीच्या अंगावर येईल काटा

आणखी वाचा- ‘नाटू नाटू’ला नामांकन मिळाल्यानंतर ऑस्करविजेत्या ए.आर. रहमान यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तेलुगू व भारतीय तालावर…”

या भेटी दरम्यान राम चरणकडून ते ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय गाण्याच्या स्टेप शिकताना दिसले. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राम चरण आनंद महिंद्रा यांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स करायला शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिलं, “रेस व्यतिरिक्त, हैदराबादमध्ये राम चरणकडून ‘नाटू नाटू’च्या बेसिक स्टेप शिकून बोनसही मिळाला. धन्यवाद मित्रा… ऑस्करसाठी शुभेच्छा.” या ट्वीटवर राम चरणनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने प्रतिक्रिया देताना लिहिलं, “आनंद महिंद्राजी तुम्ही माझ्यापेक्षा वेगाने शिकलात. तुम्हाला भेटून खूपच मज्जा आली. शुभेच्छांसाठी धन्यवाद.”

आणखी वाचा- “सर्व समजल्यानंतर आदिलची बाजू…”, राखीच्या आरोपांवर कथित गर्लफ्रेंडने अखेर सोडलं मौन

दरम्यान काही दिवसांपूर्वीच ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करच्या ओरिजनिल सॉन्ग कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे. त्याआधी या गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला होता. ‘आरआरआर’ हा चित्रपट भारताव्यतिरिक्त पाश्चिमात्य देशातही लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केलं आहे. चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर आलिया भट्ट आणि अजय देवगणही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाने जगभरात १२५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Story img Loader