अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. या विवाहसोहळ्याची मोठी चर्चा रंगली होती. आता अनंत अंबानी यांना भेटवस्तू म्हणून कोणती गोष्ट आवडते, याबद्दल ललिता डिसिल्व्हा यांनी एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे. ललिता डिसिल्व्हा यांनी अनंत अंबानी यांच्या नॅनी म्हणून काम केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाल्या ललिता डिसिल्व्हा?

ललिता डिसिल्व्हा यांनी ‘पिंकविला’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, अनंत अंबानीबद्दल अशी एखादी गोष्ट सांगू शकता का? ज्याची माहिती आजपर्यंत इंटरनेटवर उपलब्ध नाही. त्यावर उत्तर देताना ललिता डिसिल्व्हा यांनी म्हटले की, अनंतने कधीही महागड्या भेटवस्तूंचा हट्ट धरला नाही. त्याला कोणी काय गिफ्ट देऊ, असा प्रश्न विचारला, तर तो म्हणायचा की, तुम्ही मला पैसे द्या. मी एखादा प्राणी विकत घेऊन येईन. एखाद्या प्राण्याचे आयुष्य वाचवेन. हे फक्त भारतातच नाही, तर भारताबाहेरही जेव्हा तो सहलीसाठी जायचा, तेव्हादेखील कोणी त्याला भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला, तर तो ती घ्यायचा नाही. तो त्यांच्याकडून पैसे घेऊन प्राणी विकत घ्यायचा. ससा, कासव असे अनेक प्राणी त्याने विकत घेऊन, त्यांना नवीन जीवन द्यायला त्याने प्राधान्य दिले आहे. त्याला नेहमीच साधेपणा आवडतो, असे ललिता डिसिल्व्हा यांनी सांगितले आहे. ललिता डिसिल्व्हा यांनी अनंत अंबानी यांच्या नॅनी म्हणून काम केले होते. अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्यात त्यांनी लावलेल्या हजेरीनंतर त्यांची चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा: मृणाली शिर्केने सोडली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका! मुक्ताची बहीण म्हणून झळकणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, पाहा प्रोमो

दरम्यान, याआधी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ललिता डिसिल्व्हा यांनी अनंत अंबानी आणि इतर कुटुंबीयांबरोबर त्यांचे नाते कसे आहे, यावर व्यक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते, “अनंत हा पहिला मुलगा होता, ज्याची मी काळजी घेतली. त्याच्या लग्नाला हजर राहणे माझ्यासाठी अविश्वसनीय होते. माझ्या भावना मी शब्दांत सांगू शकत नाही. अनंत आजही तसाच आहे, जसा तो लहानपणी होता. तो खूप चांगला मुलगा होता आणि आजही तो तसाच आहे. पुढे त्या म्हणतात, “मी अंबानी कुटुंबाबरोबर ११ वर्षे काम केले आणि आजही मी त्यांच्या संपर्कात असते. जेव्हा ईशा आणि आकाश लहान होते, तेव्हा त्यांचीदेखील मी देखभाल केली आहे. त्यावेळी नीता अंबानी यांना मी नीतावहिनी म्हणत होते; पण आता त्यांना मॅडम म्हणते. ती खूप श्रीमंत माणसं आहेत; पण आजही मला ते विसरले नाहीत. कष्ट कधीही वाया जात नाहीत. ललिता डिसिल्व्हा यांनी सैफ-करीना यांचा मुलगा तैमूरच्या नॅनी म्हणून देखील काम केले आहे.