Anant Ambani and Radhika Merchant Wedding : मुकेश व नीता अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आज राधिका मर्चंट हिच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये अंबानी कुटुंबासह वऱ्हाडी पोहोचले आहेत. लवकरच अनंत-राधिकाची लग्नगाठ बांधली जाणार आहे. अशातच अनंत अंबानीच्या वरातीचे व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये अनंत सेलिब्रिटींसह जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत अंबानीच्या वरातीत बॉलीवूड सेलिब्रिटींसह परदेशातून आलेले पाहुणे मंडळी थिरकताना दिसले. अभिनेता रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा, रजनीकांत, अर्जुन कपूर, जॉन सीना डान्स करताना पाहायला मिळाले. अनंत अंबानीच्या वरातीत खास डिजेसह लाइव्ह परफॉर्मन्स होता. हिमेश रेशमियासह अनेक लोकप्रिय गायकांनी परफॉर्म केलं. यावेळी हिमेशने गायलेल्या ‘झलक दिखला जा’ गाण्यावर अनंत अंबानी सेलिब्रिटींसह स्टेजवर नाचताना पाहायला मिळाला.

हेही वाचा – Video: “सगळ्यांची वाजणार, हा सीझन गाजणार…”, ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड प्रिमियरची तारीख जाहीर, जाणून घ्या कधीपासून होणार सुरू

तसंच अनंतची बहिणी म्हणजेच ईशा अंबानी देखील थिरकताना दिसली. ‘लाल घाघरा’ गाण्यावर ईशा डान्स करताना पाहायला मिळाली. तिच्या मागे पती आनंद पिरामल देखील लेकीला घेऊन डान्स करत होते. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: धोतर, डोक्यावर टोपी अन्…; अनंत-राधिकाच्या लग्नातील जॅकी श्रॉफ यांच्या हटके लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – Anant Ambani Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नासाठी जॉन सीनाचा खास भारतीय पारंपरिक लूक, पाहा व्हिडीओ

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नसोहळ्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani and isha ambani dance in baraat video goes viral pps