Anant Ambani and Radhika Marchant Wedding: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षीच दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, मुकेश अंबानी यांचे गुजरातमधील मूळ गाव जामनगर येथे अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. १ मार्च २०२४ ते ३ मार्च २०२४ असे जवळपास तीन दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत. जगभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. बॉलीवूडमधीलही अनेक कलाकार अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा- अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगसाठी जामनगरच का निवडले? ‘या’ शहराशी अंबानी कुटुंबाचा आहे जवळचा संबंध

व्हीआयपी पाहुण्यांसाठी खास सोय

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबाकडून जामनगरमध्ये जय्यत तयारीही करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी पाहुण्यांसाठी अल्ट्रा लक्झरी टेन्ट (तंबू) उभारण्यात आले आहेत. या तंबूमध्ये सोफा, बेड, फ्रीज, टीव्हीपासून, एसीपर्यंतच्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवालने आपल्या इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

‘हे’ पाहुणे होणार सहभागी

अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रम सोहळ्यात मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, ॲडॉबचे सीईओ शांतनु नारायण, वॉल्ट डिज्नीचे सीईओ बॉब इगर सहभागी होणार आहेत. तर बॉलीवूड कलाकारांमध्ये सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अर्जून कपूर, मानुषी छिल्लर, जान्हवी कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, राहा, नीतू कपूर यांसारखे अनेक कलाकार अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जामनगरमध्ये पोहचले आहेत.

हेही वाचा- अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी, पाहा व्हिडीओ

उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह अनेक राजकीय मंडळीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तीन दिवसांच्या या प्री-वेडिंग कार्यक्रमामध्ये रिहानासह, अरिजित सिंह, दिलजीत दोसांझ, बी प्राक, प्रीतम, हरिहरन आणि अजय-अतुल यांचे परफॉर्मन्सदेखील होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani and radhika marchant pre wedding luxurious tent set up by the ambani family in jamnagar for vip guests dpj