Radhika Merchant And Anant Ambani Dance Video: गेल्या वर्षी उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने लग्नगाठ बांधली. १२ जुलै २०२४ रोजी अनंत अंबानी राधिका मर्चंटशी लग्नबंधनात अडकला. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट व उद्योजिक शैला मर्चंट यांची लाडकी मुलगी राधिका मर्चंट अंबानींची धाकटी सून झाली. तेव्हापासून राधिका व अनंत ठिकठिकाणी एकत्र पाहायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतेच अनंत अंबानी पत्नी राधिका मर्चंटसह खास मित्राच्या संगीत सोहळ्यात सहभागी झाला होता. यावेळी अनंत व राधिका थिरकताना पाहायला मिळाले. राधिकाने मैत्रिणींबरोबर डान्स केला, तर अनंतने मित्रांबरोबर डान्स केला. याचे व्हिडीओ ‘अंबानी अपडेट’ या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करण्यात आले आहेत.

पहिल्या व्हिडीओमध्ये राधिका मर्चंट मैत्रिणींबरोबर ‘हाउसफुल्ल २’ चित्रपटातील ‘अनारकली डिस्को चली’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी राधिकाच्या स्वॅगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या संगीत सोहळ्यासाठी तिने शिमरी सिल्व्हर कलरचा लेहंगा घातला होता.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Radhika-Dance.mp4

तसंच दुसऱ्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अनंत अंबानी आपल्या मित्रांबरोबर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. ‘शूट आउट एट लोखंडवाला’ चित्रपटातील ‘उनके नशे में’ या गाण्यावर अनंत मित्रांबरोबर थिरकताना दिसत आहे. यामध्ये अभिनेता वीर पहारियासुद्धा पाहायला मिळत आहे. राधिका आणि अनंत अंबानीचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Anant-Ambani.mp4

अनंत-राधिकाची लव्हस्टोरी

अनंत-राधिकाच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. दोघं एकत्रच मोठे झाले. त्यामुळेच लहापणापासूनच दोघांची चांगली मैत्री होती. याच मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. पण त्यानंतर दोघांनी लगेच आपल्या नात्याचा खुलासा माध्यमांसमोर केला नाही. २०१८मध्ये पहिल्यांदा अनंत-राधिकाचा रोमँटिक फोटो समोर आला होता. त्यानंतर दोघं अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले. २०२०मध्ये करोना काळात अनंत-राधिका जामनगरमध्ये अडकले होते. त्यावेळेस राधिकाने अनंतवर प्रेम करत असल्याचा खुलासा केला होता. अनंतने देखील आपल्या प्रेमाची अनेकदा कबुली दिली. महत्त्वाचं म्हणजे अनंतच्या आजारपणात राधिकाने नेहमी त्याची साथ दिली. त्यामुळे अनंत पत्नी राधिकाला आपली ताकद मानतो आणि स्वतः नशीबवान असल्याचं सांगतो.