Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाली आहे. २ जुलैला पालघरमध्ये झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यानंतर काल, ३ जुलैला ‘मामेरू’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील अंबानींचं घर अँटिलिया येथे ‘मामेरू’ कार्यक्रम पार पडला. ‘मामेरू’ ही एक गुजराती प्रथा आहे. लग्नाच्या काही दिवस आधी हा कार्यक्रम केला जातो. त्यानुसार अनंत-राधिकाचा काल ‘मामेरू’ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही बॉलीवूड सेलिब्रिटींपासून अनेक दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे ‘मामेरू’ कार्यक्रमातील अनंत-राधिकाच्या एन्ट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं १२ जुलैला हिंदू पद्धतीनं लग्न होणार आहे. पण लग्नाआधी आणि नंतर अनेक कार्यक्रमांचं आयोजन अंबानींनी केलं आहे. त्यानुसार आता लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काल झालेल्या ‘मामेरू’ कार्यक्रमात वनतारा थीमने सजलेल्या रथावरून अनंत-राधिकाची एन्ट्री पाहायला मिळाली. यावेळी अंबानी-मर्चंट कुटुंब आणि उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी दोघांचं जंगी स्वागत केलं.

हेही वाचा – नितीश चव्हाणच्या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत झळकणार ‘झी मराठी’चा जुना लोकप्रिय चेहरा, जाणून घ्या…

‘मामेरू’ कार्यक्रमासाठी अनंत-राधिकाने खास लूक केला होता. राधिकाने गुलाबी आणि नारंगी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता; ज्यावर सोन्याच्या जरीने वर्क केलं होतं. तर अनंत यांनी राधिकाला मॅचिंग असा कुर्ता आणि जॅकेट घातला होता.

हेही वाचा – दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना काय-काय दिलं? जाणून घ्या…

हेही वाचा – “आयुष्यातला सर्वात मोठा घोटाळा..”, पूजा भट्टबरोबर झालेल्या ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच रणवीर शौरीने सोडलं मौन!, म्हणाला…

दरम्यान, २ जुलैला पालघरमध्ये पार पडलेल्या ५० गरीब जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला स्वतः मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी, आनंद पिरामल यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अंबानी कुटुंबातील सदस्यांनी नवविवाहित जोडप्यांना खास भेटवस्तू, १ लाखांचा चेक आणि जीवनावश्यक गोष्टी दिल्या. तसंच प्रत्येक जोडप्याला भेटून आशीर्वादही देताना अंबानी कुटुंब पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani and radhika merchant entry with vantara inspired stage in mameru ceremony pps