Narendra Modi At Anant Ambani And Radhika Merchant Wedding : अंबानींच्या घरच्या ग्रँड लग्नसोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा चालू आहे. १२ जुलै रोजी मुंबईतल्या बीकेसी परिसरातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते राजकीय क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत सर्वांनीच हजेरी लावली होती. आज ( १३ जुलै ) अनंत-राधिकाचा शुभाशीर्वाद सोहळा चालू आहे. यासाठी खास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे.
अनंत – राधिकाच्या आशीर्वाद सोहळ्याला पोहोचले पंतप्रधान मोदी
अनंत व राधिका यांच्या आशीर्वाद सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची एन्ट्री होताच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यानंतर मोदींनी संपूर्ण अंबानी कुटुंबीयांची भेट घेतली. सर्वांची भेट घेतल्यावर पंतप्रधान नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले. अनंत व राधिकाला भेटवस्तू देऊन त्यांनी आशीर्वाद दिले. यावेळी अनंत – राधिकाने पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं पापाराझी पेजेसवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ अंबानी अपडेट्स या इन्स्टग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
अनंत-राधिकाने आशीर्वाद सोहळ्यात खास लूक केला होता. नववधू राधिका गुलाबी रंगाचा लेहेंगा, केसात कमळाची फुलं माळून अतिशय सुंदर दिसत होती. तर अनंतने मरुन रंगाची शेरवानी घातली होती.
हेही वाचा : Shah Rukh Khan and Salman Khan Dance : अनंत अंबानीच्या वरातीत करण-अर्जुनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
अनंत-राधिकाच्या या आशीर्वाद सोहळ्याला बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
दरम्यान, शाही विवाहसोहळा व आजचा आशीर्वाद सोहळा पार पडल्यावर रविवारी सायंकाळी (१४ जुलै) अनंत-राधिकाच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. यासाठी सोहळ्याला देखील देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.