Anant-Radhika Wedding: रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट या दोघांचा लग्नसोहळा १२ जुलैला पार पडला. जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पारंपरिक हिंदू रिती-रिवाजानुसार अनंत-राधिका लग्नबंधनात अडकले. मोठ्या धुमधडाक्यात दोघांचा लग्नसोहळा झाला. या शाही लग्नसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. या दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत अनंत-राधिकाने सात फेरे घेऊन आयुष्याच्या नवा प्रवासाला सुरुवात केली. दोघांच्या शाही लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गेल्या कित्येक महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाची (Anant-Radhika Wedding) चर्चा सुरू होती. लग्नाआधी दोघांचे दोन प्री-वेडिंग सोहळे पार पडले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमधील जामनगर येथे अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर मे-जूनमध्ये दोघांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटली-फ्रान्स असा प्रवास करत आलिशान क्रूझवर झाला. अनंत-राधिकाचे दोन्ही प्री-वेडिंग चांगलेच गाजले. त्यानंतर जुलै महिना सुरू होताच अनेक कार्यक्रम, समारंभ आयोजित करण्यात आले होते. मुकेश अंबानींनी आपल्या लाडक्या लेकाच्या लग्नाआधी ५० गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

हेही वाचा – Anant-Radhika Wedding: सोन्याचे वर्क असलेल्या अनंत अंबानीच्या स्नीकर्सने वेधलं लक्ष, ‘इतकी’ आहे विदेशी शूजची किंमत

२ जुलैला झालेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यानंतर मामेरू समारंभ, गरबा नाईट्स, संगीत समारंभ, ग्रह शांती पूजा, शिव शक्ती पूजा असे अनेक कार्यक्रम झाले. त्यानंतर १२ जुलैला अखेर अनंत-राधिका पती-पत्नी झाले. राधिका मर्चंट आता अंबानींची धाकटी सून झाली आहे. लग्नात अंबानींच्या या लाडक्या धाकट्या सूनेची ग्रँड एन्ट्री पाहायला मिळाली.

Anant-Radhika Wedding
अनंत अंबानी-राधिका मर्चंट (फोटो सौजन्य – अंबानी अपडेट इन्स्टाग्राम)

अनंत-राधिकाच्या लग्नातील ग्रँड एन्ट्रीने सगळ्यांचं वेधलं लक्ष

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावाजलेले संगीतकार अजय-अतुल आणि श्रेया घोषाल यांच्या लाईव्ह परफॉर्मन्सवर राधिका मर्चंटची मंडपात ग्रँड एन्ट्री झाली. पाण्यातील सुंदर अशा मोराच्या रथातून राधिका लग्नमंडपापर्यंत आली. लग्नासाठी खास राधिकाने ऑफ व्हाइट रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. ज्यावर लाल रंगाचे झरदोजी वर्क करण्यात आले होते. भरजरी दागिने व लाल बांगड्यांमध्ये राधिकाचं सौंदर्य आणखीच खुललं होतं.

हेही वाचा – Video: वरातीत अनंत अंबानीचा सेलिब्रिटींसह ‘झलक दिखला जा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, तर ईशा अंबानी थिरकली ‘लाल घाघरा’ गाण्यावर

हेही वाचा – Anant Ambani Wedding: अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात केला भांगडा; लग्न लागताच पत्नी राधिकासह केला ‘अशाप्रकारे’ आनंद व्यक्त

तसंच अनंत अंबानीने लग्नात हटके एन्ट्री केली. आपल्या मित्रमंडळींबरोबर अनंत लग्नमंडपापर्यंत पोहोचला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनंतला हात मिळवताना पाहायला मिळाले. अनंत-राधिकाच्या लग्नातील या ग्रँड एन्ट्रीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत.

अनंत-राधिकाची प्रेमकहाणी (Anant-Radhika Love Story)

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. दोघं एकत्रच मोठे झाले. त्यामुळेच लहापणापासूनच दोघांची चांगली मैत्री होती. याच मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. पण त्यानंतर दोघांनी लगेच आपल्या नात्याचा खुलासा माध्यमांसमोर केला नाही. २०१८मध्ये पहिल्यांदा अनंत-राधिकाचा रोमँटिक फोटो समोर आला होता. त्यानंतर दोघं अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले. २०२०मध्ये करोना काळात अनंत-राधिका जामनगरमध्ये अडकले होते. त्यावेळेस राधिकाने अनंतवर प्रेम करत असल्याचा खुलासा केला होता. अनंतने देखील आपल्या प्रेमाची अनेकदा कबुली दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे अनंतच्या आजारपणात राधिकाने नेहमी त्याची साथ दिली. त्यामुळे अनंत पत्नी राधिकाला आपली ताकद मानतो आणि स्वतः नशीबवान असल्याचं सांगतो.

Story img Loader