अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य प्री-वेडिंग सोहळ्याची सध्या चांगलीच चर्चा चालू आहे. मार्चमध्ये अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. आता सध्या अंबानी कुटुंबीयांच्या घरी दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याची धामधूम सुरू आहे. अंबानींनी इटली ते दक्षिण फ्रान्सपर्यंत एका लक्झरी क्रूझवर दुसऱ्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या क्रूझवर एकूण ८०० पाहुणे सहभागी होणार आहेत. या प्री-वेडिंग सोहळ्यातील काही क्षण सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
‘अमेरिकन बॉय बँड बॅकस्ट्रीट बॉईज’ हा बँड क्रूझवर परफॉर्म करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा परफॉर्मन्स ३० तारखेला म्हणजेच गुरुवारी रात्री सादर करण्यात आला होता. अंबानी अपडेट या इन्स्टाग्राम पेजवरून हे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. याशिवाय रणवीर सिंहचा क्रूझवर धमाल करतानाचा एक फोटो सुद्धा सध्या व्हायरल होत आहे. परंतु, या समारंभात सहभागी होण्यासाठी गरोदर पत्नी दीपिका पदुकोणला मुंबईत एकटं सोडून गेल्यामुळे अनेकांनी रणवीरला ट्रोल देखील केलं आहे.
डिझायनर शिल्पाने शेअर केलेल्या या व्हायरल फोटोंमध्ये रणवीरने पांढऱ्या रंगाची पँट त्यावर मॅचिंग असे शूट आणि नेव्ही ब्लू रंगाचा सॅटिन शर्ट घातला आहे. “स्टारी नाइट्स” असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. मात्र, चाहत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रियानंतर डिझायन शिल्पाने ही पोस्ट डिलीट केली आहे.
याशिवाय अनंत राधिकाची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरं प्री-वेडिंग सुरू असतानाच या दोघांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शुक्रवार १२ जुलै रोजी अनंत-राधिका सात फेरे घेणार आहेत. यानंतर शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. यानंतर रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा : Video : ‘तारक मेहता’ फेम बबिताला पडली ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, संजू राठोड कमेंट करत म्हणाला…
दरम्यान, यापूर्वी अंबानींनी जामनगरमध्ये प्री-वेडिंगसाठी भव्य पार्टी आयोजित केली होती. या तीन दिवसांत पॉप स्टार रिहाना, दिलजीत दोसांझ, एकॉन, श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग आदींनी परफॉर्मन्स सादर केले होते.