Anant-Radhika Reception: देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी १२ जुलैला लग्नबंधनात अडकला. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानीने लग्नगाठ बांधली. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात, देश-विदेशातील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत अनंत-राधिकाचं लग्न पार पडला. या शाही लग्नसोहळ्यानंतर काल, १३ जुलैला ‘शुभ आशीर्वाद’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक दिग्गज मंडळी अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यानंतर आज अनंत-राधिकाचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Live Updates
00:15 (IST) 15 Jul 2024
अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यातील गिरीजा ओकच्या मराठमोळ्या अंदाजाने वेधलं लक्ष

अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये गिरीजा ओकचा मराठमोळा अंदाज, जांभाळ्या रंगाच्या सुंदर साडीत दिसली अभिनेत्री

00:03 (IST) 15 Jul 2024
मुकेश-नीता अंबानीच्या मुलाच्या रिसेप्शनला झिशान सिद्दीकींची हजेरी

अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला झिशान सिद्दीकी यांची खास उपस्थिती

23:31 (IST) 14 Jul 2024
अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रीचा जलवा, ग्लॅमरस लूकवर नेटकरी झाले फिदा

अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा जलवा, काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये पाहायला मिळाला ग्लॅमरस अवतार

23:09 (IST) 14 Jul 2024
अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांची पत्नीसह खास हजेरी

अनंत अंबानीच्या रिसेप्शन सोहळ्याला काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिखा देशमुखसह खास हजेरी. लूकने वेधलं लक्ष.

22:55 (IST) 14 Jul 2024
अमृता खानविलकर पाठोपाठ आणखी एक मराठी अभिनेत्री पोहोचली अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला

अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला बरेच मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत. अमृता खानविलकर पाठोपाठ अभिनेत्री अनुषा दांडेकर अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला पोहोचली आहे.

22:46 (IST) 14 Jul 2024
अनंत अंबानीच्या रिसेप्शनला अभिनेता राजकुमार रावची पत्नी पत्रलेखाबरोबर उपस्थिती

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा जोडीने पोहोचले अनंत अंबानीच्या रिसेप्शन सोहळ्याला

22:37 (IST) 14 Jul 2024
मुकेश अंबानींच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये मॅचिंग आउटफिटमध्ये दिसले रकुल प्रीत-जॅकी भगनानी

अभिनेत्री रकुल प्रीत पती जॅकी भगनानीबरोबर पोहोचली अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला

22:32 (IST) 14 Jul 2024
अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये 'हीरामंडी' फेम अदिती राव हैदरीची खास हजेरी

'हीरामंडी' फेम अदिती राव हैदरी पोहोचली अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला, पाहा तिचा सुंदर लूक

22:17 (IST) 14 Jul 2024
रिसेप्शन सोहळ्यातील अनंत-राधिकाचा पहिला व्हिडीओ आला समोर, अंबानींच्या धाकट्या सुनेच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष

अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला सुरुवात झाली आहे. दोघांचा रिसेप्शनमधील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये अनंत अंबानी दिसत असून गोल्डन रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये अंबानींची धाकटी सून पाहायला मिळत आहे. यावेळी राधिका पाहुण्यांना नमस्कार करताना दिसत आहे. तिच्या याच कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

22:03 (IST) 14 Jul 2024
'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्री कुटुंबासह पोहोचली अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्री कुटुंबासह अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला पोहोचली. यावेळी ती गोल्डन रंगाच्या साडीत पाहायला मिळाली.

21:56 (IST) 14 Jul 2024
अनंत अंबानीच्या रिसेप्शनमध्ये काळा रंगाच्या लेहेंग्यात दिसली तमन्ना भाटिया, नेटकऱ्यांनी लूकचं केलं कौतुक

अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये तमन्ना भाटिया दिसली गोल्डन वर्क असलेल्या काळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यामध्ये

21:27 (IST) 14 Jul 2024
अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमधील देओल बदर्सच्या जबरदस्त लूकने वेधलं लक्ष

बॉलीवूडचे देओल बदर्स नुकतेच अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला पोहोचले. यावेळी सनी व बॉबीच्या जबरदस्त लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

20:58 (IST) 14 Jul 2024
अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी नीता अंबानींचा खास लूक; गजरा, गुलाबी साडी अन्...

अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी नीता अंबानी पोहोचल्या. यावेळी त्या सुंदर लूकमध्ये दिसल्या. गजरा, भरजरी गुलाबी साडी, हिऱ्यांचा हार, कानातले, बांगड्यामध्ये त्यांचं सौंदर्य खुलेलं पाहायला मिळालं. याशिवाय नीता अंबानींनी माध्यमांचे व पापाराझींचे आभार मानले.

20:51 (IST) 14 Jul 2024
अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये गोविंदा यांची खास हजेरी

अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा दिसले पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये

20:47 (IST) 14 Jul 2024
जॅकी श्रॉफ टायगरबरोबर पोहोचले अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला, पाहा बापलेकाची हटके स्टाइल

ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ मुलगा टायगर श्रॉफसह अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले. यावेळी दोघांची हटके स्टाइल पाहायला मिळाली. तसंच नेहमी प्रमाणे जॅकी श्रॉफ छोटंसं रोपटं घेऊन पोहोचले.

20:34 (IST) 14 Jul 2024
ईशा अंबानीचे सासू-सासरे पोहोचले अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला

अनंत-राधिकाच्या रिसेप्शनसाठी ईशा अंबानीचे सासू-सासरे स्वाती पिरामल-अजय पिरामल पोहोचले.

20:23 (IST) 14 Jul 2024
अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात युजवेंद्र चहलच्या पत्नीची खास हजेरी

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी आणि लोकप्रिय युट्यूबर धनश्री वर्मा पोहोचली मुकेश अंबानींच्या मुलाच्या रिसेप्शन सोहळ्याला

20:18 (IST) 14 Jul 2024
अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात अब्दुचा हटके लूक

‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक आणि ‘दुबईचा छोटा भाईजान’ अब्दु रोजिकने अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला खास हजेरी. पाहा अब्दुचा हटके लूक

20:08 (IST) 14 Jul 2024
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पोहोचली अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला, पाहा सुंदर लूक

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला पोहोचली आहे. याचे फोटो अमृताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

19:15 (IST) 14 Jul 2024
रिसेप्शन सोहळ्यासाठी अनंत अंबानी तयार, अँटिलिया बंगल्याबाहेरील व्हिडीओ आला समोर

अनंत अंबानी रिसेप्शन सोहळ्यासाठी तयार झाला आहे. थोड्याच वेळात कुटुंबासह अनंत अँटिलिया येथून रवाना होणार आहे.

19:02 (IST) 14 Jul 2024
खेसारी लाल यादवची अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये जबरदस्त एन्ट्री

लोकप्रिय भोजपुरी अभिनेता, गायक खेसारी लाल यादव अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला उपस्थित

Anant Ambani Reception Live Updates

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या रिसेप्शन सोहळ्यातील प्रत्येक अपडेट्स.....

Story img Loader