भारतातीय उद्योगपती मुकेश अंबानी याचा धाकटा मुलगा अनंत व राधिका मर्चटच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. १ मार्चपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमात जगभरातील अनेक दिग्गज मंडळीनी उपस्थिती लावली, तसेच हॉलीवूडपासून, बॉलीवूड, दाक्षिणात्य कलाकार या सोहळ्यात सहभागी झाले होते. याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी हॉलीवूड गायिका रिहाने आपल्या गाण्यावर सगळ्यांना थिरकायला भाग पाडले. तर दुसऱ्या दिवशी बॉलीवूडमधील कलाकारांचा एकापेक्षा एक जबरदस्त डान्स बघायला मिळाला. या कार्यक्रमात नीता अंबानी व मुकेश अंबानी यांनी रोमँटिक गाण्यावर डान्स केला. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेलले ते अनंत-राधिकाच्या डान्सने.
अनंत व राधिकाने ७० च्या दशकातील शम्मी कपूर व मुमताज यांच्या ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’ गाण्यावर डान्स केला. विरेंद्र चावला यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोघे रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंबाने पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. ‘मेन्स एक्सपी’च्या रिपोर्टनुसार तीन दिवासाच्या या शाहीकार्यक्रमासाठी अंबानी यांनी जवळपास १ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या प्री वेडिंग कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना जेवणात २५०० प्रकारचे पदार्थ चाखायला मिळत आहेत. यासाठी इंदौरवरुन ६५ आचार्यांना बोलवण्यात आले आहे.