Anant Ambani And Radhika Merchant Sangeet Ceremony : अंबानीच्या घरी सध्या लेकाच्या लग्नाची जय्यत तयारी चालू आहे. येत्या १२ जुलैला हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच अनंत-राधिकाचा संगीत सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्याला कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते. याशिवाय नुकताच टी-२० विश्वचषक जिंकलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा देखील या सोहळ्याला उपस्थित राहिला होता. रोहितसह हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव या खेळाडूंचं अंबानींच्या पार्टीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.

अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली. यासाठी खास सुप्रसिद्ध हॉलीवूड गायक जस्टिन बिबर भारतात आला होता. याशिवाय आलिया-रणबीर, अर्जुन कपूर व त्याच्या बहिणी, अंबानी कुटुंबीय, सलमान खान यांनी या सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स सादर केले. सध्या या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच अंबानी कुटुंबाच्या पार्टीमधील आणखी एक Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित शर्मासह हार्दिक, सूर्यकुमार हे भारतीय खेळाडू नीता अंबानींसह व्यासपीठावर उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : ‘ओम शांती ओम’, शाहरुख खानच्या गाण्यावर अंबानी कुटुंबाचा जबरदस्त डान्स! जावई आनंद पिरामलही थिरकले

रोहित, सूर्यकुमार आणि हार्दिक रंगमंचावर येताच ’83’ चित्रपटातील “लेहरा दो…” हे गाणं बॅकग्राऊंडला लावण्यात आलं. यानंतर विश्वचषक विजेत्या संघातील या तीन खेळाडूंचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेक्षकांमध्ये असलेल्या सगळ्या बॉलीवूडकरांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मंचावर मुकेश अंबानी आले आणि त्यांनी सुद्धा या खेळाडूंचं कौतुक केलं. शेवटी रोहितशी संवाद साधताना नीता अंबानी भावुक झाल्या होत्या.

हेही वाचा : “यांचा घटस्फोट होतोय हे नक्की…”, नताशा पती हार्दिक पंड्याबरोबर नसल्याने ‘त्या’ व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स

दरम्यान, टीम इंडियाने २९ जून रोजी बार्बाडोसमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. यामुळे जवळपास १३ वर्षांनी आयसीसी ट्रॉफी पुन्हा एकदा भारतात आली. त्यामुळे सर्वत्र टीम इंडियाच्या खेळाडूंचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विश्वचषक जिंकल्यावर गुरुवारी टीम इंडिया मायदेशी परतली. देशात आल्यावर सर्वप्रथम सगळ्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर दिल्ली ते मुंबई असा प्रवास करत हे सगळे खेळाडू मरिन ड्राइव्ह परिसरात दाखल झाले. याचठिकाणी ओपन बसमधून भारतीय संघाच्या विजयी परेडला सुरुवात झाली. सगळ्या खेळाडूंचं चाहत्यांनी मोठ्या दणक्यात स्वागत केलं.