Anant Ambani Wedding Menu : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे. या समारंभाला बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंतचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देखील अंबानींच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. सध्या या शाही लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रणवीर-दीपिका, आलिया-रणबीर, सलमान खान, शाहरुख-गौरी, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, बच्चन कुटुंबीय, सिद्धार्थ – कियारा, विकी-कतरिना, जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे असे सगळेजण या समारंभात सहभागी झाले होते. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी देसी गर्ल प्रियांका चोप्रा सुद्धा परदेशातून भारतात आली होती. याशिवाय किम कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल असे अनेक मान्यवर मुंबईत दाखल झाले होते.
हेही वाचा : Video : अंबानींच्या धाकट्या सूनेचा जामनगरमध्ये भव्य गृहप्रवेश! अनंत-राधिकाचा गुजरातमधील व्हिडीओ व्हायरल
अंबानींच्या लग्नात मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल ( Anant Ambani )
देश-विदेशातून आलेल्या या सगळ्या पाहुण्यांसाठी अंबानींच्या लग्नसोहळ्यात एकूण अडीच हजारांहून अधिक पदार्थ बनवण्यात आले होते. अनंत-राधिकाच्या लग्नात अमेरिकन, पंजाबी, महाराष्ट्रीय, दाक्षिणात्य पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. यामध्ये अनेक मराठमोळ्या पदार्थांचा समावेश आहे. अंबानींच्या लग्नसोहळ्यातील मराठी पदार्थांची यादी जाणून घेऊयात…
अनंत-राधिकाच्या लग्नात मराठी पदार्थांच्या मेन्यूमध्ये थालीपीठ, मिरची – शेंगदाण्याचा ठेचा, मिरची व कैरी ठेचा, मिरचीचा ठेचा, भरलेली वांगी, पुणेरी आलू, बटाट्याची भाची, डाळिंबी उसळ, मसाले भात, मोदक असे बरेच पदार्थ होते. याचं मेन्यू कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, अनंत ( Anant Ambani ) – राधिकाचा साखरपुडा २०२३ मध्ये पार पडला होता. यानंतर यावर्षी मार्च महिन्यात दोघांचा प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचं इटलीत क्रुझवर आयोजन करण्यात आलं होतं. या भव्य सेलिब्रेशननंतर अनंत-राधिका १२ जुलैला ( शुक्रवार ) विवाहबंधनात अडकले. शनिवारी या जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम पडला तर, रविवारी अंबानी कुटुंबीयांनी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.