Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानी लग्नगाठ बांधणार आहे. दोघांच्या लग्नसोहळ्यासाठी अवघे काही तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे सध्या अंबानींच्या पाहुण्यांची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कालपासून अनंत-राधिकाच्या लग्नासाठी देशातील आणि परदेशातील पाहुणे मंडळी मुंबईत दाखल होताना दिसत आहेत. काही देशांच्या पंतप्रधानांसह हॉलीवूड, बॉलीवूड आणि इतर सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी मुंबईत पोहोचले आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाची तयार झाली असून लग्नमंडपाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचं लग्न नीता-मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (NMACC) होणार आहे. माहितीनुसार, दुपारी ३ वाजता शुभ मुहूर्तावर दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या अनंत-राधिकाचा लग्नमंडप पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. अशातच लग्नमंडपाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. NMACCमधील लग्नमंडपाचा व्हिडीओ ‘अंबानी अपडेट’ या इन्स्टाग्राम पेजवरील स्टोरीमध्ये शेअर करण्यात आला आहे.

Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
marathi actor siddharth khirid propose to girlfriend in goa
दोन देश, दोघांचं करिअरही वेगळं…; मराठी अभिनेत्याने गर्लफ्रेंडला गोव्यात घातली लग्नाची मागणी; म्हणाला, “२२ एप्रिल २०२२…”

हेही वाचा – Video: हर हर महादेव…; अनंत-राधिकाच्या लग्नाआधी अँटिलियावर ‘अशी’ पार पडली शिव शक्ती पूजा, Unseen Video आला समोर

या व्हिडीओमध्ये, अनंत-राधिकाच्या लग्नाचा मंडप शाही पद्धतीने सजवलेला दिसत आहे. आकर्षण विद्युत रोषणाई सुंदररित्या केलेली पाहायला मिळत आहे. तसंच पाहुण्यांची आसन व्यवस्था स्टेजसमोरचं केली आहे. लग्नातल्या प्रत्येक छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

हेही वाचा – Video: ‘जवान’ दिग्दर्शक अ‍ॅटलीचा विकी कौशलबरोबर ‘तौबा तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात थिरकले

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यासाठी प्रियांका चोप्रा पती निक जोनसबरोबर मुंबईत दाखल झाली आहे. याशिवाय जगप्रसिद्ध स्टार किम कार्दशियन आणि ख्लोए कार्दशियन मुंबईत पोहोचली आहे. या शाही लग्नसोहळ्यासाठी बॉलीवूडचे अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. तसंच देशातील राजकीय नेते मंडळी देखील अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

हेही वाचा – अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाआधी झालेली शिव शक्ती पूजा का केली जाते? जाणून घ्या…

अनंत-राधिकाच्या शाही लग्नानंतर उद्या १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात निमंत्रित पाहुणे मंडळींसह रिलायन्स आणि जिओ कंपनीचे मोठे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय १५ जुलैला रिसेप्शन पार्टी देखील असणार आहे.

Story img Loader