उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा १० एप्रिल रोजी २८वा वाढदिवस होता. अनंतने दुबईमध्ये त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं, त्या सेलिब्रेशनमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमने अनंतच्या वाढदिवसाच्या पार्टीत परफॉर्म केल्याचं दिसतंय.
Video: “‘सिंहासन’ चित्रपट वेदना देणारा”; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, म्हणाल्या, “४४ वर्षांनंतरही…”
उद्योगपती अनंतने यंदा त्याची होणारी पत्नी राधिका मर्चंटसोबत दुबईत आपला भव्य वाढदिवस साजरा केला. अनंतच्या वाढदिवसानिमित्त गायक आतिफ अस्लमने खास परफॉर्मन्स दिला. अनंतच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो ऑनलाइन प्रचंड व्हायरल होत आहेत. अंबानीच्या फॅन पेजने शेअर केलेल्या एका व्हायरल फोटोमध्ये राधिका तिच्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. पांढऱ्या ड्रेसमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत आहे.

एका फोटोत आतिफ अस्लम स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. दरम्यान, गायक राहत फतेह अली खान यांनीही ‘बॉडीगार्ड’ चित्रपटातील ‘तेरी मेरी’ गाणे गाऊन अनंतचा वाढदिवस अधिक खास बनवला. तर बी प्राक, सिंगर-रॅपर किंग यांनीही परफॉर्मन्स केले.

दरम्यान, गेल्या वर्षी अनंतने जामनगर येथील रिलायन्स टाऊनशिप रिफायनरीत वाढदिवस साजरा केला होता.