देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या अँटिलिया घरी दीड दिवसांचा बाप्पा विराजमान झाला होता. नवविवाहित जोडी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या हस्ते रिति-रिवाजानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. शनिवारी रात्री बॉलीवूडसह दिग्गज मंडळींनी अँटिलियातील बाप्पाचं दर्शन घेतलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता सलमान खान, रेखा, करिना कपूर, सैफ अली खान, जान्हवी कपूर, काजोल, अ‍ॅटली, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, आशुतोष गोवारिकर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी असे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी अंबानींच्या घराच्या बाप्पाचं दर्शन पोहोचले होते. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांनी देखील अंबानींच्या घराच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर रविवारी ८ सप्टेंबरला अँटिलियाच्या गणरायाचं विसर्जन झालं. दीड दिवसांच्या या बाप्पाची मोठी मिरवणुक पाहायला मिळाली. या मिरवणुकीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यामधील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणला गिफ्टच्या माध्यमातून दिली मोठी संधी, गायक जाहीर करत म्हणाला, “तुझ्यासाठी आम्ही शिंदेशाही कुटुंब…”

या व्हिडीओतील गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट तल्लीन होऊन डान्स करताना पाहायला मिळत आहेत. पाणी आणि गुलालीची उधळण करत दोघं जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. गणपती विसर्जनातील अनंत-राधिकाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

हेही वाचा – Video: “निक्कीबरोबर अरबाजच्या जागी पॅडी दादा असते तर…?” अंकिताच्या प्रश्नाला पंढरीनाथ कांबळेने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला…

दरम्यान, गणपती विसर्जनासाठी अनंत अंबानीने नारंगी रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. तर राधिकाने गडद निळ्या रंगाचा सूट सेट परिधान केला होता. तसंच नीता अंबानी गुलाबी रंगाच्या साडीत पाहायला मिळाल्या. नीता अंबानींचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani dance with radhika merchant at ganesh visarjan video viral pps