Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा काल, ५ जुलैला संगीत सोहळा पार पडला. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे अनंत-राधिकाचा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या संगीत सोहळ्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी उपस्थितीत लावली होती. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरसह बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला; ज्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाला अवघे ६ दिवस बाकी आहेत. सध्या लग्नाआधीचे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत. सामूहिक विवाह सोहळा, मामेरू समारंभ आणि गरबा नाईटनंतर काल संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्यात अंबानी कुटुंबासह बॉलीवूडचे सेलिब्रिटी थिरकले. अनंत अंबानी तर सलमान खानबरोबर त्याच्याच गाण्यावर डान्स करताना दिसला. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो

हेही वाचा – Video: संगीत सोहळ्यातील अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांची जिंकली मनं, पापाराझींना म्हणाले…

या व्हिडीओत, अनंत अंबानी आपल्या मित्रांसह सलमान खानबरोबर डान्स करताना दिसत आहे. २००० साली प्रदर्शित झालेला सलमानचा ‘हर दिल जो प्यार करेगा’ चित्रपटातील सोनू निगमने गायलेलं ‘ऐसा पहिली बार हुआ है’ गाण्यावर अनंत आणि सलमान जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी आणि सलमान खानचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: रश्मी ठाकरे यांची लेक तेजसबरोबर अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला खास हजेरी, लूकने वेधलं लक्ष

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. माहितीनुसार, अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी दोघं लग्नाचे सात फेरे घेणार आहेत. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Story img Loader